- Home
- Mumbai
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरू होणार मेट्रोचा नवा मार्ग, जाणून घ्या कुठून कुठंपर्यंत धावणार!
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरू होणार मेट्रोचा नवा मार्ग, जाणून घ्या कुठून कुठंपर्यंत धावणार!
Mumbai Metro 2B Update: मुंबई मेट्रोचा नवा मार्ग 2B पुढील आठवड्यात सुरू होत आहे, ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणारय. डायमंड गार्डन ते मंडाळे या पहिल्या टप्प्यामुळे पूर्व-पश्चिम जोडणी मजबूत होऊन प्रवासाचा वेळ तब्बल ५०% नी कमी होण्यास मदत होईल.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
Mumbai Metro 2B Update: मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाहतुकीच्या ताणात दिलासा देण्यासाठी आणि प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी मुंबई मेट्रोचा नवा मार्ग मेट्रो 2B पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. या मार्गामुळे पूर्व-पश्चिम जोडणी मजबूत होणार असून प्रवासाचा वेळ तब्बल 50 टक्क्यांनी कमी होणार आहे.
उद्घाटनाची अंतिम तयारी
मेट्रो 2B च्या डायमंड गार्डन ते मंडाळे या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
असा असणार मेट्रो 2B चा प्रवास
एकूण लांबी: 23.64 किलोमीटर
एकूण स्थानके: 20
पहिला टप्पा: डायमंड गार्डन – मंडाळे
प्रमुख स्थानके: शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द आणि मंडाळे डेपो
या मार्गिकेला CMRS चे प्रमाणपत्र मिळाले असून, उद्घाटनानंतर तातडीने प्रवाशांसाठी सेवा सुरू केली जाणार आहे.
प्रवास वेळेत मोठी कपात
मेट्रो 2B चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होणार आहे. त्यानंतर मंडाळे ते दहिसर पूर्व असा अखंड मेट्रो प्रवास शक्य होईल. पूर्ण मार्गिका सुरू झाल्यानंतर
पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गांना थेट जोडणी मिळेल
मेट्रो 1, 2A, 3 आणि 4 नेटवर्कशी संपर्क वाढेल
प्रवासाचा वेळ सुमारे 50% ने कमी होईल
मंडाळे कारशेड ठरणार नवं ‘हब’
या प्रकल्पासाठी मंडाळे येथे 31 एकर क्षेत्रात आधुनिक कारशेड उभारण्यात आले आहे. येथे एकावेळी 72 मेट्रो गाड्या उभ्या करता येतील. भविष्यातील मेट्रो मार्गांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
उद्घाटनाची पार्श्वभूमी
मूळतः या मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3 सोबत होणार होता. मात्र प्रमाणपत्र देण्यात झालेल्या विलंबामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अखेर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्वतंत्रपणे हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

