सार

Mumbai Mega Block : मुंबईत रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

 

Mumbai Mega Block : मुंबईत रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. रविवारी १६ जून दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नाही. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भायंदर स्थानकांदरम्यान मध्यरात्री ब्लॉक घेतला जाईल.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असून, अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

सीएसएमटी येथून सकाळी १०:२५ ते दुपारी २:४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०:५० ते दुपारी ३ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा दरम्यान नियोजित थांब्यावर थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिराने धावतील.

पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल / बेलापूर / वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल - वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाऊन धिम्या लाइनवर

१) ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून ही लोकल सकाळी १०:२० वाजता सुटणार आहे.

२) ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून ही लोकल दुपारी ३:०३ वाजता सुटणार आहे.

डाऊन हार्बर मार्गावर

१) ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून ही लोकल सकाळी १०:१८ वाजता सुटणार आहे.

२) ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून ही लोकल दुपारी ३:४४ वाजता सुटणार आहे.

अप हार्बर मार्गावर

१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०:०५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

२) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:४५ वाजता सुटणार आहे.

आणखी वाचा :

Maharashtra Monsoon Update: कोकण, मराठवाड्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज