Mumbai Fire : टाइम्स टॉवरला भीषण आग, घटनास्थळी 9 अग्निशमनच्या गाड्या दाखल

| Published : Sep 06 2024, 08:54 AM IST / Updated: Sep 06 2024, 09:49 AM IST

Times Tower Fire in Mumbai

सार

Mumbai Lower Parel Fire : मुंबईतील गजबजलेल्या लोअर परेल येथील टाइम्स टॉवर इमारतीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.

Times Tower Fire : मुंबईतील लोअर परेल पश्चिमेला असणाऱ्या टाइम्स टॉवरला शुक्रवारी (6 सप्टेंबर) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, टाइम्स टॉवरची इमारत कमला मिल्स येथे आहे. सध्या घटनास्थळी 9 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. मुंबई महापालिकेने आग लागल्याच्या दुर्घटनेची माहिती देत म्हटले की, इमारतीला लागलेली आग विझवली जात आहे.

कोणतीही जीवतहानी नाही
मुंबई महापालिकेने लोअर परेलमधील टाइम्स टॉवरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. महापालिकेने म्हटले की, घटनास्थळी 9 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. येथे कोणतीही जीवतहानी झालेली नाही. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे.

टाइम्स टॉवर मुंबईतील लोअर परेलच्या पश्चिमेला 7 मजली व्यावसायिक इमारत आहे. महापालिकेनुसार, कमला मिलमध्ये असणाऱ्या टाइम्स टॉवरला सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी आग लागल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाने दुसऱ्या स्तराची आग असल्याची माहिती दिली आहे. आतापर्यंत दुर्घनेत कोणतीही जखमी झालेली नाही. पण घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
टाइम्स टॉवरला लागलेल्या भीषण आगीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे यांनी म्हटले की, कमला मिल्सच्या कंम्पाउंडमध्ये पाच वर्षांमध्ये तिसऱ्यांदा आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. येथील इमारतीत आगीच्या सुरक्षिततेसंदर्भात अजिबात ऑडिट केलेले नाही. याशिवाय कमला मिल्समध्ये दिवगागणिक अनाधिकृत बांधकाम वाढू लागले आहे. स्थानिक आमदारही अनाधिकृत बांधकामांना पाठिंबा देत आहेत. संबंधित जणांवर कार्यवाही करावी. एवढेच नव्हे लोकप्रतिनिधी बेकायदा बांधकामांना का पाठीशी घालत आहेत? असा सवालही संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना उपस्थितीत केला.

आणखी वाचा : 

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत रात्रभर विशेष BEST बस सेवेची सोय

गेटवे ऑफ इंडियावर चप्पलचा पाऊस: शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आंदोलन