- Home
- Mumbai
- मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्यापासून लोकलच्या वेळा बदलणार; प्रवासाला निघण्यापूर्वी 'हे' नवीन वेळापत्रक नक्की तपासा
मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्यापासून लोकलच्या वेळा बदलणार; प्रवासाला निघण्यापूर्वी 'हे' नवीन वेळापत्रक नक्की तपासा
Mumbai Local : पश्चिम रेल्वेने १ जानेवारी २०२६ पासून लोकल आणि काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल जाहीर केले. हे बदल विशेषतः डहाणू रोड आणि विरार पट्ट्यातील प्रवाशांसाठी असून, यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्यापासून लोकलच्या वेळा बदलणार
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने लोकल आणि काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून हे बदल लागू होणार आहेत. विशेषतः डहाणू रोड आणि विरार पट्ट्यातील प्रवाशांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
बदल करण्याचे मुख्य कारण काय?
रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, लोकलचा प्रवास अधिक सुसाट व्हावा, गाड्यांच्या वेळेत अचूकता यावी आणि प्रवाशांना होणारी गर्दीची ओढाताण कमी व्हावी, या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
काय आहेत महत्त्वाचे बदल?
डहाणू रोड विभाग: या विभागातील अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशांच्या ईएमयू (EMU) गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
पहिली लोकल: नवीन वेळापत्रकानुसार, चर्चगेटहून सुटणाऱ्या अनेक डाऊन गाड्या आता पहाटे ५:०३ वाजल्यापासून उपलब्ध होतील. यामुळे पहाटे कामावर जाणारे कामगार, दूध विक्रेते आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.
व्याप्ती: हे बदल प्रामुख्याने चर्चगेट, विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवांसाठी लागू असतील.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, १ जानेवारीपासून घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक तपासावे. सुधारित वेळांची सविस्तर माहिती प्रत्येक स्थानकावरील स्टेशन मास्तरांकडे आणि सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच रेल्वेच्या अधिकृत ॲपवरही हे बदल पाहता येतील.

