MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Local Update : बदलणार प्रवास! मुंबई लोकलसाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन, आता लोकल कशी धावणार? वाचा; प्रत्येक मुंबईकरासाठी महत्त्वाची बातमी!

Mumbai Local Update : बदलणार प्रवास! मुंबई लोकलसाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन, आता लोकल कशी धावणार? वाचा; प्रत्येक मुंबईकरासाठी महत्त्वाची बातमी!

Mumbai Local Update : मुंबई लोकलच्या वाढत्या गर्दी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वयंचलित दरवाजे असलेल्या दोन नॉन-एसी लोकल तयार होत असल्याची घोषणा केली आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Dec 15 2025, 09:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबई लोकलसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लान!
Image Credit : X(Twitter)

मुंबई लोकलसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लान!

Mumbai Local News : मुंबई उपनगरीय रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र वाढती गर्दी, अपघातांची मालिका आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दररोज 60 लाखांहून अधिक प्रवासी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सुमारे 3 हजार लोकल फेऱ्यांमधून प्रवास करतात. अशा परिस्थितीत, मुंब्रा स्थानकाजवळील दुर्घटनेनंतर लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबई लोकलसंदर्भात महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. 

25
स्वयंचलित दरवाज्यांच्या नॉन-एसी लोकल येणार
Image Credit : Getty

स्वयंचलित दरवाज्यांच्या नॉन-एसी लोकल येणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की, स्वयंचलित दरवाजे असलेल्या दोन नॉन-एसी लोकल ट्रेन रेकची निर्मिती चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे सुरू आहे. 3 डिसेंबर रोजी खासदार वर्षा गायकवाड आणि संजय दिना पाटील यांनी लोकलमधील गर्दी व अपघातांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी हा महत्त्वाचा खुलासा केला. 

Related Articles

Related image1
मोठी घोषणा! मनरेगा बंद, मोदी सरकार आणत आहे 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर होणार किती अतिरिक्त भार?
Related image2
Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'डबल लॉटरी'! आजपासून लोकलच्या 10 नव्या फेऱ्या, 2 नवीन स्टेशन; 'या' मार्गावर धावणार!
35
नव्या लोकलमध्ये काय असणार विशेष?
Image Credit : Getty

नव्या लोकलमध्ये काय असणार विशेष?

या नव्या ईएमयू (EMU) लोकल रेकमध्ये प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत.

स्वयंचलित बंद दरवाजे

दोन डब्यांमधील वेस्टिब्युल जोडणी

छतावर विशेष व्हेंटिलेशन युनिट

दरवाजांजवळ हवेच्या वहनासाठी झडपयुक्त खिडक्या

रेल्वेच्या मते, या सुविधा नॉन-एसी लोकल असूनही प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि तुलनेने आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील. 

45
जुन्या लोकलमध्ये बदल शक्य नाही
Image Credit : Getty

जुन्या लोकलमध्ये बदल शक्य नाही

दरम्यान, मध्य रेल्वेने यापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये एका लोकल रेकवर स्वयंचलित दरवाज्यांचा प्रायोगिक प्रयोग केला होता. या रेकच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि महाव्यवस्थापकांनी त्याची पाहणीही केली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे सध्या धावणाऱ्या साध्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवणे शक्य नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही सुविधा नव्या लोकल रेकमधूनच लागू केली जाणार आहे. 

55
पुढील 5 वर्षांत 238 एसी लोकल
Image Credit : Getty

पुढील 5 वर्षांत 238 एसी लोकल

याशिवाय, पुढील पाच वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 238 नव्या वातानुकूलित (AC) लोकल गाड्या टप्प्याटप्प्याने खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या निर्णयाला काही प्रवासी संघटनांचा विरोध असला तरी, सुरक्षित, आधुनिक आणि शिस्तबद्ध प्रवासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काचं घर! सिडको लॉटरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Recommended image2
MHADA Lottery Rules: म्हाडाच्या एका सोडतीत किती अर्ज भरता येतात? जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम!
Recommended image3
कोकणवारी आता सुपरफास्ट! मुंबई-सिंधुदुर्ग 'रो-रो' फेरी सुरू होणार; ६ तासांत प्रवास अन् सोबतीला स्वतःची गाडी!
Recommended image4
मुंबई महापालिकेत शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; राज सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी
Recommended image5
Mumbai Monorail: मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! नव्या ढंगात पुन्हा धावणार 'मोनोरेल'; अधिक सुरक्षित आणि हायटेक सुविधांसह MMRDA सज्ज
Related Stories
Recommended image1
मोठी घोषणा! मनरेगा बंद, मोदी सरकार आणत आहे 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर होणार किती अतिरिक्त भार?
Recommended image2
Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'डबल लॉटरी'! आजपासून लोकलच्या 10 नव्या फेऱ्या, 2 नवीन स्टेशन; 'या' मार्गावर धावणार!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved