मुंबई पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांसाठी सुरक्षिततेचा इशारा जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी अचानक जाणं टाळण्यासोबतच कोणतीही पूर्वकल्पना न देता चाहत्यांना भेटू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटींना मुंबई पोलिसांनी सुरक्षिततेबाबत इशारा दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी अचानक जाणं टाळा आणि पूर्वसूचना न देता चाहत्यांना भेटू नका, अशा कडक सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. शूटिंगची माहिती आणि खाजगी दौरे सोशल मीडियावर शेअर करू नका, तसेच धमकी किंवा खंडणीसाठी फोन आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या, असंही या इशाऱ्यात म्हटलं आहे. अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानावर दोनदा बॉम्बची धमकी आली होती, तसेच आयुष्मान खुराणा आणि तुषार कपूर यांनाही खंडणीसाठी फोन आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.