- Home
- Mumbai
- Mumbai Local : पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक! सोमवार–मंगळवारी 240 लोकल रद्द, प्रवाशांची मोठी कोंडी
Mumbai Local : पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक! सोमवार–मंगळवारी 240 लोकल रद्द, प्रवाशांची मोठी कोंडी
Mumbai Local : पश्चिम रेल्वेने कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कामामुळे १२ आणि १३ जानेवारी रोजी तब्बल २४० लोकल फेऱ्या रद्द होणार असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईकरांनो सावधान! उद्यापासून घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा
मुंबई : मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कामामुळे सोमवार आणि मंगळवार, म्हणजेच 12 व 13 जानेवारी रोजी तब्बल 240 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. परिणामी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो.
आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलचा फटका
पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार रात्री (11 जानेवारी) ते सोमवार पहाटे कांदिवली–बोरिवली दरम्यान जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
अप जलद मार्ग: रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15
डाउन जलद मार्ग: मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30
हा ब्लॉक कांदिवली स्थानकातील पॉइंट्स व सिग्नलिंग प्रणालीच्या महत्त्वाच्या कामांसाठी घेण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
सलग दोन दिवस सेवा विस्कळीत
याच धर्तीवर सोमवार (12 जानेवारी) रात्री कांदिवली ते मालाड दरम्यानही असाच रात्रीचा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत
12 डब्यांच्या लोकल
15 डब्यांच्या लोकल
एसी लोकल सेवा
रद्द राहणार आहेत. दोन्ही दिवशी प्रत्येकी सुमारे 120 लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने एकूण 240 फेऱ्यांचा परिणाम प्रवाशांवर होणार आहे.
प्रवाशांना आवाहन
पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्था, वेळेचे योग्य नियोजन आणि रेल्वेच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

