12:22 PM (IST) Sep 25

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live Updates परळचा महाराजाचा विसर्जनासाठी मार्गस्थ

परळचा महाराजाचा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. उत्तम बॅलेंन्सिंगचा उदाहरण असलेली ही मुर्ती नेहमीच आकर्षणाचा बिंदू ठरते. 

12:12 PM (IST) Sep 25

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live Updates चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मंडपातून बाहेर

चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मंडपातून बाहेर आला आहे. 

11:48 AM (IST) Sep 25

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live Updates काळाचौकीचा महाराजाचा श्रॉफ बिल्डिंगजवळ पोहोचला

काळाचौकीचा महाराजाचा श्रॉफ बिल्डिंगजवळ पोहोचला आहे. येथे बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. 

11:20 AM (IST) Sep 25

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live Updates रंगारी बदक चाळीचा महाराजा विसर्जनासाठी मार्गस्थ

रंगारी बदक चाळीचा महाराजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. 

11:00 AM (IST) Sep 25

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live Updates राजा तेजुकायाच्या मिरवणुकीला सुरुवात

राजा तेजुकायाच्या मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे. संपूर्ण लालबाग-परळ भाग आज गुलालाने माखला जाणार आहे. मिरवणुकीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत बाप्पाला निरोप देत आहेत. 

10:52 AM (IST) Sep 25

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live Updates लालाबागच्या राजाची मिरवणूकीपुर्वी आरती

लालाबागच्या राजाची मिरवणूक सुरू होण्याआधी आता आरती केली जात आहे. यानंतर राजा मिरवणूकीसाठी मार्गस्थ होणार आहे. 

YouTube video player

10:43 AM (IST) Sep 25

Mumbai Ganpati Visarjan 2026 Live Updates मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू

लालबागमधील मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जात असून गुलालाची उधळण केली जात आहे. 

YouTube video player