मुंबईतील शिवाजी पार्क येथील कॅफे कॅडेलचा FSSAI परवाना एफडीएने निलंबित केला आहे. याशिवाय मुलुंडमध्येही एफडीएने एका फूड सेंटवर कारवाई केली आहे.

मुंबई : मुंबईतील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील लोकप्रिय कॅफे कॅडेलसह (Cafe Cadell) काही रेस्टॉरंटवर तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. एफडीएने कॅफे कॅडेचा एफएसएसएआय (FSSAI) परवाना निलंबित केला आहे.

कॅफे कॅडेलमध्ये काय आढळले?

20 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणीत कॅफे कॅडेलlमध्ये पुरेशी हवा जाण्यासाठी न व्यवस्था नसल्याचे आढळले. तसेच कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याचे एफडीएच्या तपासणीत समोर आले. फूडवर तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची नियमित तपासणी केल्याच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. याशिवाय, कीटकांना रोखण्यासाठी योग्य जाळ्या किंवा स्क्रीन नसणे, व्हेज आणि नॉन-व्हेज फूड वेगवेगळे न ठेवणे, कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे तसेच साफसफाई आणि सॅनिटाइजेशनसंबंधित काही त्रुटी आढळल्याचे एफडीएने स्पष्ट केले.

चाइना टाऊन फास्ट फूड सेंटरवरही एफडीएकडून कारवाई

मुलुंड पूर्व येथील चाइना टाऊन फास्ट फूड सेंटरवरहीमध्येही एफडीएच्या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाबी आढळल्या. अधिकाऱ्यांच्या मते, फूड सेंटरमधील परिस्थिती ग्राहकांच्या आरोग्यासाठी संभाव्य धोका निर्माण करणारी होती.

तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांमध्ये आर्टिफिशियल कलर्स आणि एमएसजीचा (MSG) अतिवापर होत असल्याचे आढळले. तसेच किचनसाठी वापरले जाणारे तेल वारंवार वापरणे आणि ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिडाइज्ड झाल्याचेही तपासणीत समोर आले. याशिवाय परिसरात झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्याचे एफडीएने नमूद केले.

अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता, सुरक्षित पाणी, फूडचे योग्य तापमानात स्टोरेज, कच्च्या आणि शिजवलेल्या फूडची स्वतंत्र हाताळणी करणे तसेच कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे खाद्य आस्थापनांनी अन्नसुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे मुंबईतील रेस्टॉरंट, कॅफे आणि फास्ट फूड सेंटरमध्ये अन्नपदार्थांच्या स्वच्छता व गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.