MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Holi 2026: मुंबईकरांनो, सोसायटीत होळी साजरी करताय? पालिकेची 'ही' नियमावली वाचली नाही तर पडेल महागात!

Holi 2026: मुंबईकरांनो, सोसायटीत होळी साजरी करताय? पालिकेची 'ही' नियमावली वाचली नाही तर पडेल महागात!

Holi 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईकरांसाठी होळी आणि धुळवड साजरी करण्याकरिता विशेष नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, होलिका दहनासाठी झाडे तोडण्यास मनाई असून, पाण्याचा अपव्यय टाळून नैसर्गिक रंगांनी होळी खेळण्याचे आवाहन केले आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 28 2026, 05:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईकरांनो, सोसायटीत होळी साजरी करताय?  'ही' नियमावली वाचा
Image Credit : ANI

मुंबईकरांनो, सोसायटीत होळी साजरी करताय? 'ही' नियमावली वाचा

मुंबई : रंगांचा उत्सव आणि आनंदाचा सण 'होळी' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा मुंबईत होळी आणि धुळवड साजरी करताना तुम्हाला नियमांचे पक्के पालन करावे लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईकरांसाठी खास नियमावली जाहीर केली असून, पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. यंदाची होळी सुरक्षित आणि इको-फ्रेंडली साजरी करण्यासाठी पालिकेचे हे 'रुल बुक' नक्की जाणून घ्या. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
होलिका दहन (२ मार्च): झाडे तोडाल तर सावधान!
Image Credit : ANI

होलिका दहन (२ मार्च): झाडे तोडाल तर सावधान!

सोमवार, २ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या होलिका दहनासाठी पालिकेने कडक सूचना दिल्या आहेत.

वृक्षतोड बंदी: होळीसाठी जिवंत झाडे किंवा झाडांच्या फांद्या तोडण्यास सक्त मनाई आहे. प्रशासनाने फक्त कोरड्या लाकडाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

प्रदूषण टाळा: होळीमध्ये प्लास्टिक, रबर, टायर किंवा रासायनिक रंग लावलेले लाकूड जाळू नका. यातून निघणारा विषारी धूर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

सोसायटीसाठी सूचना: गृहनिर्माण संस्थांनी शक्यतो पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीनेच होलिका दहन करावे. 

Related Articles

Related image1
मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्यापासून 'बेस्ट'चे मार्ग बदलणार; तुमचे बस स्टॉप बदलले का? एकदा चेक कराच!
Related image2
Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या लोकलने फिरताय? ही बातमी वाचल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा होईल फजिती!
35
धुळवड आणि रंगपंचमी (३ मार्च): पाण्याचा जपून वापर
Image Credit : ANI

धुळवड आणि रंगपंचमी (३ मार्च): पाण्याचा जपून वापर

मंगळवार, ३ मार्च रोजी रंग खेळताना मुंबईकरांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे लागणार आहे.

पाण्याचा अपव्यय टाळा: मुंबईवर पाण्याचे संकट ओढवू नये, यासाठी कोरडी होळी खेळण्यावर भर द्या आणि पाण्याचा विनाकारण वापर टाळा.

नैसर्गिक रंगांचा वापर: रासायनिक आणि जड धातूयुक्त रंगांमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. त्यामुळे फक्त 'इको-फ्रेंडली' किंवा सेंद्रिय (Organic) रंगांचाच वापर करा.

शांतता राखा: सणाचा आनंद घेताना ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळा. विशेषतः रुग्णालय आणि निवासी क्षेत्रांजवळ मोठ्या आवाजाचे डीजे किंवा स्पीकर लावणे टाळावे. 

45
प्रशासनाचे आवाहन
Image Credit : ANI

प्रशासनाचे आवाहन

मुंबईच्या महापौर रितू तावडे, आयुक्त भूषण गगराणी आणि प्रशासकीय टीमने मुंबईकरांना 'स्वच्छ आणि निरोगी' मुंबईसाठी सहकार्य करण्याचे विनंती केली आहे. सण साजरा करताना निसर्ग संपदेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे पालिकेने म्हटले आहे. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : Getty

महत्त्वाची टीप

नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी झाडे तोडल्यास किंवा प्रदूषण केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. 

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Recommended image2
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू
Recommended image3
Mumbai Road Rage : मुंबईत राँग साईडने येऊन महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
Ashish Shelar: ठाकरेंचा मोर्चा म्हणजे 'लंगूर मोर्चा', शेलारांची खोचक टीका
Recommended image5
Delhi Police EOW: २१ कोटींच्या फसवणूक प्रकरणात वॉन्टेड भामट्याला मुंबईतून अटक
Related Stories
Recommended image1
मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्यापासून 'बेस्ट'चे मार्ग बदलणार; तुमचे बस स्टॉप बदलले का? एकदा चेक कराच!
Recommended image2
Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या लोकलने फिरताय? ही बातमी वाचल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा होईल फजिती!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved