MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mhada Lottery 2026: मुंबई-ठाण्यात स्वतःच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची 5000 घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' प्राईम लोकेशन्सवर मिळणार संधी

Mhada Lottery 2026: मुंबई-ठाण्यात स्वतःच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची 5000 घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' प्राईम लोकेशन्सवर मिळणार संधी

Mhada Lottery 2026: म्हाडा लवकरच मुंबई, ठाण्यात तब्बल 5,000 घरांसाठी मोठी लॉटरी जाहीर करणारय. मार्चअखेर, एप्रिलच्या सुरुवातीला जाहिरात प्रसिद्ध होणार असून, यामध्ये पवई, घाटकोपर, लोअर परळ, मानपाडा आणि बाळकूम यांसारख्या भागांतील घरांचा समावेश असेल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 22 2026, 03:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मुंबई ठाण्यात स्वतःच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची 5000 घरांसाठी बंपर लॉटरी
Image Credit : our own

मुंबई-ठाण्यात स्वतःच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची 5000 घरांसाठी बंपर लॉटरी

मुंबई: मुंबई आणि ठाणे सारख्या शहरात स्वतःचं हक्काचं घर असावं, असं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लवकरच तब्बल 5,000 घरांसाठी मोठी लॉटरी जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात खिशाला परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा आता संपणार असून, मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला या घरांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

26
मुंबई मंडळ: 3000 घरांची मोठी संधी
Image Credit : our own

मुंबई मंडळ: 3000 घरांची मोठी संधी

मुंबई म्हाडा मंडळ जवळपास 2800 ते 3000 घरांच्या विक्रीसाठी सज्ज झाले आहे. सध्या या घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

Related Articles

Related image1
इराण-इस्रायल तणावाचा थेट फटका मुंबईला! दक्षिण मुंबईत घर घेणं आता आणखी महागणार; जाणून घ्या नेमकं कारण
Related image2
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २,५०० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' दिवशी निघणार जाहिरात
36
कुठे असतील ही घरं?
Image Credit : Twitter

कुठे असतील ही घरं?

या लॉटरीमध्ये प्रामुख्याने पवई, घाटकोपर आणि प्रतीक्षा नगर येथील घरांचा समावेश असेल.

प्राईम लोकेशन्स

'मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा'कडून प्राप्त झालेली लोअर परळ, वडाळा आणि माझगाव यांसारख्या हाय-प्रोफाइल भागांतील सुमारे 143 घरंही या लॉटरीत उपलब्ध असतील. याशिवाय 'अॅडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम' अंतर्गत येणारी घरंही सर्वसामान्यांच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतात. 

46
ठाणे आणि कोकण विभाग: 2000 घरांची लॉटरी
Image Credit : Twitter

ठाणे आणि कोकण विभाग: 2000 घरांची लॉटरी

मुंबईपाठोपाठ ठाणेकरांसाठीही म्हाडाच्या कोकण मंडळाने कंबर कसली आहे. एप्रिलच्या शेवटपर्यंत सुमारे 2000 घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

ठाण्यातील मुख्य ठिकाणे

ठाण्यातील मानपाडा, चितळसर आणि बाळकूम यांसारख्या विकसित भागांत ही घरे उपलब्ध असतील. 

56
20 टक्के योजनेचा लाभ
Image Credit : Twitter

20 टक्के योजनेचा लाभ

खासगी बिल्डरांच्या प्रकल्पांतील '20 टक्के राखीव योजने'अंतर्गत मिळणाऱ्या घरांचाही यात समावेश असेल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली आहे. 

66
लॉटरीसाठी अर्ज कधी करायचा?
Image Credit : Twitter

लॉटरीसाठी अर्ज कधी करायचा?

मुंबई मंडळाची जाहिरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तर कोकण मंडळाची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून वेग घेईल. इच्छुक अर्जदारांनी आतापासूनच आपली कागदपत्रे तयार ठेवणे फायद्याचे ठरेल.

टिप: घरांच्या किमती निश्चित झाल्यावर म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Rent : वांद्र्यात 2BHK साठी 80K भाडं, तरुणी म्हणते 'एक-एक पैसा वसूल'; व्हिडीओ व्हायरल
Recommended image2
Pydhonie Death Case Mumbai : कलिंगड नव्हे, काहीतरी वेगळंच! पायधुनी मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
Recommended image3
Mumbai Pydhonie Death Case : पायधूनीतील चार जणांच्या मृत्यूचे गूढ गडद; डॉक्टरांनी सांगितली ही धक्कादायक माहिती
Recommended image4
कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण
Recommended image5
मीरा रोड सुरक्षारक्षकांवर धारधार हत्याराने झाला हल्ला, मुंबईतील या हल्ल्यामागे कोणाचा आहे हात?
Related Stories
Recommended image1
इराण-इस्रायल तणावाचा थेट फटका मुंबईला! दक्षिण मुंबईत घर घेणं आता आणखी महागणार; जाणून घ्या नेमकं कारण
Recommended image2
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २,५०० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' दिवशी निघणार जाहिरात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved