सार

रेल्वे रूळ, सिग्नल, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी १९ मे ला मेगाब्लॉक घेतला आहे. रविवारी 19 मे ला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वे रूळ, सिग्नल, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी १९ मे ला मेगाब्लॉक घेतला आहे. रविवारी 19 मे ला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून रविवार 19 मे ला हार्बर आणि मेन लाईनवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 दरम्यान ब्लॉक असणार आहे. तर माटुंगा आणि मुलूंड अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लाईन वर 11.5 ते 3.55 दरम्यान ब्लॉक राहणार आहे. दर रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि काही दुरूस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो.

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत, तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.