MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • HBD MH : रक्तरंजित संघर्षानंतर ६५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा झाला जन्म, वाचा अंगावर काटा आणणारा इतिहास

HBD MH : रक्तरंजित संघर्षानंतर ६५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा झाला जन्म, वाचा अंगावर काटा आणणारा इतिहास

मुंबई ः १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी त्यावेळी वेगवेगळी राज्ये उदयाला आली नव्हती. प्रचंड संघर्ष आणि रक्तरंजित लढ्यानंतर एकसंध महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

2 Min read
Vijay Lad
Published : May 01 2025, 12:07 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
Image Credit : Asianet News

१९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्या अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांची निर्मिती करण्यात आली. भाषेच्या आधारावर या राज्याची निर्मिती करण्यात आली.

29
Image Credit : Asianet News

यावेळी मुंबईत मराठी, गुजराती आणि हिंदी भाषा बोलणारे लोक राहत होते. मराठी भाषा बोलणार्या लोकांची संख्या सर्वात जास्त होती. तेव्हा मुंबई बॉम्बे प्रांतात होते. त्यामुळे दोन्ही भाषांची वेगवेगळी राज्ये व्हावीत अशी मागणी जोर धरु लागली.

Related Articles

Related image1
केवळ १० मिनिटांत बनवा पारंपरिक आमरस, थेट आईच्या हातची चव!
Related image2
आमरस ते आम्रखंड..., पिकलेल्या आंब्यापासून बनवले जातात हे ८ गोड पदार्थ
39
Image Credit : Asianet News

परंतु, दोन्ही भाषकांच्या लोकांना मुंबई आपल्या राज्यात हवी होती. तसेच केंद्र सरकारमध्ये असलेल्या काही लोकांना मुंबई स्वतंत्र राज्य असावे असेही वाटत होते. त्यामुळे पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला.

49
Image Credit : Asianet News

मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही, अशी माहिती मिळाल्यावर संयमी मराठी लोकांचा पारा चढला. प्रचंड चिड निर्माण झाली. त्याचे रुपांतर रक्तरंजित आंदोलनात झाले.

59
Image Credit : Asianet News

मुंबईत ठिकठिकाणी चर्चा, बैठका, आंदोलन सुरु झाली. याच वेळी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांनी सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी मुंबई दणाणून सोडली. एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसर्या बाजूने बोरीबंदर येथून मोर्चे निघाले. तेव्हा फ्लोरा फाऊंटन या नावाने ओळखल्या जाणार्या जागी दोन्ही मोर्चे एकत्र आले.

69
Image Credit : Asianet News

पोलिसांना या लोकांना आवारण कठीण जाऊ लागले. पोलिसांनी सुरवातीला लाठीमार केला. त्यानंतर गोळीबार केला. बॉम्बे प्रांताचे तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिल्याचे सांगितले जाते. या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३०० जखमी झाले.

79
Image Credit : Asianet News

तेव्हापासून या जागेला हुतात्मा चौक असे नाव पडले. जनतेचा दबाव वाढू लागला. तरीही केंद्र सरकार ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सरकारने कठोर पावले उचलल्याने आणखी नागरिकांचा मृत्यू झाला.

89
Image Credit : Asianet News

दुसरीकडे महागुजरातच्या आंदोलनानेही वेग घेतला. त्यामुळे केंद्र सरकारपुढे हा मुद्दा चांगलाच अडचणीचा झाला. अखेर संयुक्त महाराष्ट्र समिती आणि आंदोलकांच्या दबावापुढे केंद्राला झुकावे लागले. १९६० मध्ये महाराष्ट्राचा जन्म झाला. दुसरीकडे गुजरातलाही स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

99
Image Credit : Asianet News

या संपूर्ण संघर्षात महाराष्ट्रातील १०९ आंदोलकांना आपले बलिदान द्यावे लागले. त्यानंतर सशक्त महाराष्ट्राचा उदय झाला.

About the Author

VL
Vijay Lad

Recommended Stories
Recommended image1
आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Recommended image2
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
Recommended image3
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
Recommended image4
Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
Recommended image5
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!
Related Stories
Recommended image1
केवळ १० मिनिटांत बनवा पारंपरिक आमरस, थेट आईच्या हातची चव!
Recommended image2
आमरस ते आम्रखंड..., पिकलेल्या आंब्यापासून बनवले जातात हे ८ गोड पदार्थ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved