बिहारचे CM नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, डीजीपींना पाठवली ऑडिओ क्लिप

| Published : Feb 15 2024, 05:42 PM IST / Updated: Feb 15 2024, 05:43 PM IST

nitish kumar
बिहारचे CM नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, डीजीपींना पाठवली ऑडिओ क्लिप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Bihar CM Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय होते? वाचा सविस्तर..

Bihar CM Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या वृत्तामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या.

ऑडिओ क्लिप पाठवून दिली धमकी

बिहारच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप एका व्यक्तीने थेट डीजीपींना पाठवली होती. "भाजपासोबत जाऊ नका, असे नितीश यांना सांगा. अन्यथा त्यांच्यावर बॉम्बहल्ला करण्यात येईल", अशा शब्दांत धमकी देण्यात आली होती.

नितीश कुमार यांच्याव्यतिरिक्त अनेक आमदारांना जीवे मारण्याचाही उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये होता. याप्रकरणी पोलिसांनी सोनू पासवान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. सोनू पासवानला कर्नाटकातील देवनागिरी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पासवान हा समस्तीपूर बिहारचा रहिवासी आहे.

धमकी देण्यामागे होते ‘हे’ कारण

पोलिसांनी सोनू पासवानची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकार कोसळल्याच्या बातमीमुळे त्रासल्याने ही धमकी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सरकारमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे बेरोजगारी आणि विकासावर परिणाम होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केलेला मोबाइल फोनही जप्त केला आहे.

आणखी वाचा

सुप्रीम कोर्टाकडून Electoral Bonds योजना रद्द, SBIला 3 आठवड्यांत द्यावा लागेल अहवाल

Breast Cancer : या सोप्या पद्धतीने होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, वेदनादायक तपासण्यांपासून आता सुटका

President Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू हे नाव कोणी दिले? जाणून घ्या राष्ट्रपतींचा प्रेरणादायी प्रवास