MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मुंबईत हक्काचं घर हवंय? लॉटरीचं टेन्शन सोडा! म्हाडाच्या 'या' घरांसाठी उद्यापासून करा थेट बुकिंग

मुंबईत हक्काचं घर हवंय? लॉटरीचं टेन्शन सोडा! म्हाडाच्या 'या' घरांसाठी उद्यापासून करा थेट बुकिंग

MHADA first come first served scheme: म्हाडाने मुंबईतील प्राइम लोकेशन्सवर १२० सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध केल्यात. यासाठी लॉटरीची गरज नसून ५ फेब्रुवारीपासून नोंदणी १२ फेब्रुवारीपासून अर्ज, पेमेंट प्रक्रिया सुरू होत आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 04 2026, 09:26 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईत हक्काचं घर हवंय? लॉटरीचं टेन्शन सोडा!
Image Credit : Twitter

मुंबईत हक्काचं घर हवंय? लॉटरीचं टेन्शन सोडा!

मुंबई : मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हाडाने मुंबईतील विविध प्राइम लोकेशन्सवर तब्बल १२० सदनिका (Flats) 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (First Come, First Served) या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला लॉटरीच्या निकालाची वाट पाहावी लागणार नाही! 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
महत्त्वाच्या तारखा आणि वेळ (नोंद करून ठेवा!)
Image Credit : Twitter

महत्त्वाच्या तारखा आणि वेळ (नोंद करून ठेवा!)

नोंदणी सुरू (Registration): ५ फेब्रुवारी, सकाळी ११:०० वाजल्यापासून.

अर्ज व पेमेंट प्रक्रिया सुरू: १२ फेब्रुवारी, सकाळी ११:०० वाजल्यापासून.

कुठे अर्ज करायचा? म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर: https://housing.mhada.gov.in/

Related Articles

Related image1
Mumbai MHADA Lottery: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या १२० फ्लॅट्ससाठी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य'; ताडदेव ते कांदिवलीपर्यंत संधी!
Related image2
मुंबईच्या रनवेवर IndiGo आणि Air India विमानांचे पंख एकमेकांना धडकले, दोन्ही विमानांमध्ये होते प्रवासी!
35
कशी असेल प्रक्रिया? (Step-by-Step Guide)
Image Credit : Twitter

कशी असेल प्रक्रिया? (Step-by-Step Guide)

१. नोंदणी: सर्वात आधी ५ फेब्रुवारीपासून म्हाडाच्या पोर्टलवर आपली नोंदणी पूर्ण करा.

२. सदनिका निवड: १२ फेब्रुवारीला लॉगिन केल्यानंतर तुम्हाला 'Book My Home' हा पर्याय दिसेल. यात तुम्ही इमारतीचे नाव, विंग, मजला आणि सदनिका क्रमांक पाहून तुमच्या आवडीचे घर निवडू शकता.

३. पेमेंट: एकदा घर निश्चित (Select) केले की, अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम ऑनलाइन भरावी लागेल.

४. १०% रक्कम: सदनिका बुक केल्यावर ४८ तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या १०% रक्कम भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन तात्पुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) मिळेल.

महत्त्वाची टीप: अर्ज एकदा सादर केल्यावर त्यात कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे माहिती भरताना विशेष काळजी घ्या.

45
कुठे आणि किती घरे उपलब्ध आहेत?
Image Credit : Twitter

कुठे आणि किती घरे उपलब्ध आहेत?

म्हाडाने मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही उपनगरांत ही घरे उपलब्ध केली आहेत.

१. म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील ८४ सदनिका

कांदिवली: शिंपोली (८), चारकोप सेक्टर-८ (२)

वडाळा: अँटॉप हिल (२७)

पवई: तुंगा परिसर (४४)

इतर: मानखुर्द (१), मालवणी-मालाड (२)

२. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (DCR) मिळालेल्या ३६ सदनिका

दक्षिण मुंबई: भायखळा (६), ताडदेव (६), लोअर परळ (४)

उपनगर: घाटकोपर पूर्व (२), विक्रोळी-कन्नमवार नगर (१), अंधेरी पश्चिम-JVPD (७), शीव (२) आणि अँटॉप हिल (८).

55
लॉटरीशिवाय घर मिळवण्याची मोठी संधी!
Image Credit : our own

लॉटरीशिवाय घर मिळवण्याची मोठी संधी!

यापूर्वीच्या लॉटरीत काही कारणास्तव शिल्लक राहिलेली ही घरे आता थेट विक्रीसाठी काढण्यात आली आहेत. त्यामुळे 'आधी येईल, त्याला प्राधान्य' या नियमानुसार जो आधी फॉर्म भरेल आणि पैसे भरेल, त्याचे घर पक्के होईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Demolition Drive at Bandra : गरीबनगर हटवल्यानंतर रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट; वांद्रे स्टेशनला मिळणार नवा चेहरा
Recommended image2
मानसिक आरोग्य जनजागृतीचा दीप मालवला; डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
Recommended image3
Viral Video : मुलाला दहावीच्या परीक्षेत मिळाले 55%, पण आई-वडिलांनी जे केलं ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Recommended image4
Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 14 आणि 15 मे रोजी पहाटे कोस्टल रोड बंद; वाहतूक वळवली जाणार
Recommended image5
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचं भाडं कमी होणार? प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मोठी मागणी
Related Stories
Recommended image1
Mumbai MHADA Lottery: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या १२० फ्लॅट्ससाठी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य'; ताडदेव ते कांदिवलीपर्यंत संधी!
Recommended image2
मुंबईच्या रनवेवर IndiGo आणि Air India विमानांचे पंख एकमेकांना धडकले, दोन्ही विमानांमध्ये होते प्रवासी!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved