मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, विशेषतः वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका ऑफिसमधून घरी परतणाऱ्या नोकरदारांना बसत आहे, कारण अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.

मुंबई - मुंबईत पावसाने हाहाकार माजला आहे. पावसामुळं ट्राफिकचा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आलेल्या आहेत. आज संध्याकाळी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढलाय. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. वाहतुकीवर त्याचा परिणाम मोठया प्रमाणावर झाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

बोरिवलीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ट्रॅफिकमध्ये गुंतली 

बोरिवलीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. काही भागात सकल पाणी साचलं आहे. सर्वसामान्य वाहतूक आहे ती वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऑफिसमधून घरी जायला निघालेल्या प्रवाशांना या ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं या पावसाचा फटका नोकरदारांना सहन करावा लागतो.

मुंबईत बसवर कोसळलं होत झाड

मुंबईत बसवर काही दिवसांवर झाड कोसळलं होत. त्यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झाडांच्या तोडीवर प्रश्नचिन्ह उभं राहील होत. यावेळी महानगरपालिकेने झाड बाजूला काढलं होत.