- Home
- Mumbai
- Harbour Railway News: हार्बर मार्गावर मोठा बदल! ‘ही’ स्थानके मध्य रेल्वेकडे जाणार, नेमकं काय घडलं?
Harbour Railway News: हार्बर मार्गावर मोठा बदल! ‘ही’ स्थानके मध्य रेल्वेकडे जाणार, नेमकं काय घडलं?
Harbour Railway News: मध्य रेल्वे लवकरच सिडकोकडून ट्रान्स-हार्बर मार्गावरील १० स्थानके ताब्यात घेणारय, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. या निर्णयाने पनवेल, वाशी, ठाणे यांसारख्या स्थानकांवरील स्वच्छता, पाणी, इतर प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा होणारय

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
मुंबई: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लवकरच मध्य रेल्वे ट्रान्स-हार्बर मार्गावरील दहा महत्त्वाच्या स्थानकांचा ताबा घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे या मार्गावरील सेवा आणि सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात या स्थानकांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
25 वर्षांपूर्वी सिडकोने उभारलेली स्थानके, आता रेल्वेच्या ताब्यात!
सुमारे 25 वर्षांपूर्वी सिडकोने हार्बर रेल्वे मार्गावरील ही स्थानके उभारली होती. मात्र त्यानंतरच्या काळात या स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीसंदर्भात सिडको व रेल्वे प्रशासनामध्ये मतभेद वाढले. त्यामुळेच या स्थानकांचा ताबा थेट मध्य रेल्वेकडे देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जुनी झालेली ही स्थानके आवश्यक दुरुस्ती आणि नव्या स्वरूपात विकसित केल्यानंतरच ती ताब्यात घेतली जातील.
कोणती स्थानके येणार आहेत मध्य रेल्वेकडे?
या प्रस्तावित हस्तांतरणात पुढील महत्त्वाची स्थानकं समाविष्ट आहेत.
हार्बर मार्ग: पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर, बेलापूर, सीवूड-दारावे, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी
ट्रान्स-हार्बर मार्ग: ठाणे-तुर्भे-वाशी
या स्थानकांवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे या निर्णयाचा सकारात्मक परिणाम थेट प्रवाशांवर होणार आहे.
प्रवाशांच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा अपेक्षित
सध्या या स्थानकांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, लाईट्स, फॅन्स, प्लॅटफॉर्मची फरशी, भुयारी मार्ग, प्रकाश व्यवस्था अशा अनेक बाबींमध्ये कमतरता आहे. प्रवाशांकडून वारंवार या सुविधांबाबत तक्रारी येत आहेत. रेल्वेने ताबा घेतल्यानंतर या सुविधा सुधारण्याची अपेक्षा आहे.
हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू, एप्रिल 2025 पासून रक्कम जमा
एप्रिल 2025 पासून रेल्वे प्रशासन सिडकोकडे हस्तांतरणासाठी आवश्यक निधी जमा करत आहे. स्थानकांची जबाबदारी घेण्याआधी त्यांची दुरुस्ती आणि काही ठिकाणी नव्याने बांधणी करण्याची मागणी रेल्वेकडून करण्यात आली आहे.
शेवटी काय?
मध्य रेल्वेकडून या स्थानकांचा ताबा घेतल्यास, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळेल. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव नक्कीच सुधारेल.

