Dy CM Eknath Shinde and MP Sanjay Raut meets : महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली. शिंदेंनी हात जोडून अभिवादन केले असता, संजय राऊत यांनी मात्र हात मागे ठेवत कोणताही प्रतिसाद दिला नाही.
Dy CM Eknath Shinde and MP Sanjay Raut meets : सध्या महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली. यावेळी शिंदेंनी हात जोडून त्यांना अभिवादन केले. मात्र तरीही संजय राऊत यांनी हात मागेच ठेवत त्यांच्या अभिवादनाला जराही प्रतिसाद दिला नाही. यावरुन दोघांमधील कटून अजूनही जराही कमी झालेली नाही, असे दिसून आले.
महापालिका निवडणूक प्रचारामुळे राजकीय नेत्यांचे प्रचार दौरे सुरु आहेत. तसेच वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर मुलाखतीही दिसून येत आहेत. हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी एकनाथ शिंदे गेले होते. मुलाखत संपल्यावर बाहेर पडताना त्यांना खासदार संजय राऊत दिसले. राऊतही याच वृत्त वाहिनीला मुलाखत देण्यासाठी आले होते. यावेळी दोघांची धावती भेट झाली.
प्रकृतीची चौकशी
या अल्प भेटीत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यावर राऊतांनी योग्य प्रतिसाद दिला. परंतु, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी अभिवादन करण्यासाठी दोन्ही हात जोडले. तेव्हा संजय राऊत यांनी दोन्ही हात मागेच ठेवले. त्यांच्या अभिवादनाला प्रतिसाद दिला नाही. यावरुन दोघांमधील कटूता अजूनही तसीच असल्याचे दिसून येते.
दोघांमधील कटूता संपता संपेना
एकनाथ शिंदे आणि संजय राऊत कायम एकमेकांवर टिका-टिप्पणी करताना दिसतात. शिंदे गुवाहाटीला गेले होते, तेव्हा राऊतांनी त्यांना रेडा असे संबोधले होते. यावरुनही मोठा गदारोळ झाला होता. याचीच परिणती या अल्प भेटीत दिसून आली.


