डोंबिवली गावात कार आणि रिक्षाचा अपघात झाल्यानंतर रिक्षाचालकाने आत्महत्या केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कारचालकाने त्यांना मारहाण करून 2 लाख रुपये मागितले होते.
हल्लीच्या काळात सध्या अपघातानंतर मारहाण घडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. एखाद्या गाडीने धडक दिल्यावर दुसरा गाडीवाला मनात राग धरून अपघात घडत असल्याचं दिसून आलं आहे. डोंबिवली गावामध्ये कारचालक आणि रिक्षा यांचा अपघात झाला. या अपघातानंतर रिक्षा चालकाणे आत्महत्या केली असून हे का घडलं हे आपण जाणून घेऊयात.
अपघात घडल्यानंतर रिक्षाचालकाने केली आत्महत्या -
अपघात घडल्यानंतर रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना कार चालकाने मारहाण केली. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केली असून नातेवाईकांनी मारहाणीच्या या कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. कारचालकाने २ लाख रुपये मागितल्याच रिक्षा चालकाने घरी सांगितलं होत. “जोपर्यंत आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला आहे.
नातेवाईक काय म्हणाले? -
कारचालक हा शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक आहे, त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या, आम्हाला न्याय पाहिजे, एका वृद्ध रिक्षाचालकाबाबत असा धक्कादायक प्रकार घडला हे संतापजनक आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
