सार

मुंबईसह कोल्डप्ले कॉन्सर्ट गुजरातमधील अहमदाबाद येथे देखील होणार आहे. वर्ष 2016 नंतर पहिल्यांदा कोल्डप्लेचा भारतात पुन्हा शो होणार आहे. यामुळे वाहतूक पोलिसांकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यासह रस्ते मार्गात बदल केले आहेत.

Coldplay Mumbai Concert 2025 : ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्ले वर्ल्ड टूरवर असून आजपासून (18 जानेवारी) पुढील तीन दिवस मुंबईत असणार आहेत. मुंबईतील कॉन्सर्टनंतर अहमदाबाद येथे देखील कोल्डप्ले यांचा कॉन्सर्ट होणार आहेत. मुंबईत होणाऱ्या कोल्डप्लेच्या कॉन्सर्टसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशातच नवी मुंबई पोलिसांकडून कॉन्सर्टनिमित्त काही नियम लागू केले आहेत. याशिवाय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जेणेकरुन कॉन्सर्टवेळी कोणतीही दुर्घटना घडू नये.

कोल्डप्लेचा कॉन्सर्ट कधी?

ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेचा भारतातील पहिला शो मुंबईत होणार आहे. हा शो 18, 19 आणि 21 जानेवारीला नवी मुंबईतील डीव्हाय पाटील स्टेडियममध्ये आहे. या कॉन्सर्टसाठी कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांसाठी मार्गदर्शक सुचना

  • नवी मुंबईतील पोलिसांनी कोल्डप्लेचा कॉन्सर्ट सुरळीत पार पडण्यासाठी कठोर सुरक्षाव्यवस्थेत तयारी केली आहे.
  • रस्त्यांवरुन अवजड सामान नेणाऱ्या गाड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
  • 18,19 आणि 21 जानेवारीला दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत.
  • आवश्यक सामान, आपत्कालीन सेवा आणि शासकीय वाहनांना सूट असेल.
  • नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी बदललेल्या रस्ते मार्गांबद्दल जाणून घ्यावे असे सांगण्यात आले आहे.
  • स्टेडियमच्या बाहेर अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात असतील.
  • विशेष स्थानिक ट्रेस सेवेसाठी BookmyShow कडून भारतीय रेल्वेसोबत करार केला आहे.
  • स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी सिटीफ्लो बस उपलब्ध असणार आहेत.

कॉन्सर्टसाठी एन्ट्री गेट कधी खुलणार?

  • कॉन्सर्टसाठी गेट दुपारी 3 वाजता खुलला जाणार असून संध्याकाळी 7.45 मिनिटांनी बंद केला जाणार आहे.
  • एन्ट्रीसाठी मार्गदर्शक सूचना
  • शासकीय ओखळपत्र किंवा primary transactor’s ID proof ची सॉफ्ट कॉपी सोबत असावी.
  • हातावरील बँड तिकीटाप्रमाणे काम करतील.
  • एकदा तिकीट स्कॅन झाल्यानंतर पुन्हा प्रवेश मिळणार नाही.
  • हँडवर असणाऱ्या बँडची काळजी घ्यावी.

रस्ते मार्गात बदल

सायन-पनवेल महामार्ग, उरण रोड, पाम बीच रोड आणि पूर्व एक्सप्रेस हायवे या मार्गांवरुन प्रवास करणे टाळावा. याव्यतिरिक्त येण्याजाण्यासाठी ठाणे-बेलापुरा रोड, ट्रान्स हार्बर लिंक आणि पश्चिम मुंबईतील प्रवाशांनी जेवीएलआर आणि एरोली ब्रिजचा वापर करू शकता.

आणखी वाचा : 

मुंबईला असुरक्षित म्हणणे योग्य नाही, सैफ अली खान हल्ल्यानंतर फडणवीसांचे वक्तव्य

एलिफंटा बेटाचे नाव कसे पडले?, जाणून घ्या येथील प्राचीन गुहांचे रहस्य