- Home
- Mumbai
- CIDCO Lottery 2025 : नवी मुंबईत स्वतःचं घर, तेही फक्त २२ लाखांत! सिडकोची मोठी घोषणा; 'या' प्राईम लोकेशनसाठी आजच अर्ज करा!
CIDCO Lottery 2025 : नवी मुंबईत स्वतःचं घर, तेही फक्त २२ लाखांत! सिडकोची मोठी घोषणा; 'या' प्राईम लोकेशनसाठी आजच अर्ज करा!
CIDCO Lottery 2025 : सिडकोने नवी मुंबईत 2025 साठी मोठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली असून, मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची संधी आहे. यात द्रोणागिरी, तळोजा आणि खारघरसारख्या प्राईम लोकेशनमध्ये अवघ्या 22 लाख रुपयांपासून घरे उपलब्ध आहेत.

सिडकोची बंपर लॉटरी!
CIDCO Lottery 2025 Navi Mumbai : स्वतःचं घर असावं हे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. मात्र शहरांतील वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकांसाठी दूरच राहतं. पण आता ही चिंता दूर होणार आहे. सिडकोकडून नवी मुंबईत स्वस्त दरात घरांची मोठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून, अवघ्या 22 लाख रुपयांत प्राईम लोकेशनमध्ये घर मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मध्यमवर्गीयांसाठी सुवर्णसंधी
सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. नवी मुंबईसारख्या नियोजित शहरात, तेही उत्तम ठिकाणी, कमी किमतीत घर मिळणे ही संधी फारच दुर्मीळ मानली जात आहे.
कुठे मिळणार घर? जाणून घ्या प्राईम लोकेशन
ही लॉटरी नवी मुंबईतील द्रोणागिरी नोड येथे आहे. अटल सेतूपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या भागात फक्त 22 लाख रुपयांत घर खरेदीची संधी मिळू शकते. याशिवाय तळोजा आणि खारघर या विकसित आणि मागणी असलेल्या भागांमध्येही सिडकोकडून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया कशी करायची?
या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास इच्छुक नागरिकांनी सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
वेबसाइट: cidcofcfs.cidcoindia.com
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 डिसेंबर 2025
संधी सोडू नका
नियोजित शहर, उत्तम कनेक्टिव्हिटी, भविष्यातील वाढती किंमत आणि तेही परवडणाऱ्या दरात घर ही संधी मध्यमवर्गीयांसाठी खरोखरच महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्यांना नवी मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं आहे, त्यांनी ही सिडको लॉटरी चुकवू नये.

