MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Dhirubhai Ambani International School : जगात टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय शाळा, मुंबईतील शाळेची फी किती?

Dhirubhai Ambani International School : जगात टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय शाळा, मुंबईतील शाळेची फी किती?

मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलने जगात भारी कामगिरी केलीये. 2026 च्या इंटरनॅशनल बॅकलॉरिएट (IB) डिप्लोमा प्रोग्राम रँकिंगमध्ये या शाळेने जगात 9 वा क्रमांक पटकावलाय.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 22 2026, 08:47 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
जगात 9 वा क्रमांक, विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी
Image Credit : dais.edu.in

जगात 9 वा क्रमांक, विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलने (DAIS) जगात आपला डंका वाजवलाय. एज्युकेशन ॲडव्हायझर्स यूकेने 2026 चं जागतिक रँकिंग जाहीर केलंय. यात IB डिप्लोमा प्रोग्राम देणाऱ्या शाळांमध्ये DAIS ने 9 वा क्रमांक मिळवलाय. 2026 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सरासरी 40.8 पॉईंट्स मिळवलेत. शाळेच्या इतिहासातील हा सर्वात बेस्ट स्कोअर आहे. जगातल्या टॉप 10 शाळांमध्ये जागा मिळवणारी ही एकमेव भारतीय शाळा ठरलीये.

विशेष म्हणजे, टॉप 10 शाळांच्या यादीत DAIS मध्येच सर्वात जास्त म्हणजे 105 विद्यार्थी IB डिप्लोमा करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना शिकवून असा भारी रिझल्ट देणं, हे शाळेचं यश आहे. विद्यार्थ्यांची आवड, उत्तम शिक्षण आणि क्रिएटिव्हिटी यामुळेच हे शक्य झाल्याचं शाळेने म्हटलंय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
धीरूभाई अंबानी स्कूलची फी किती आहे?
Image Credit : dais.edu.in

धीरूभाई अंबानी स्कूलची फी किती आहे?

जगात नाव कमावलेल्या या शाळेत आपल्या मुलांना टाकावं, असं अनेक पालकांना वाटतं. पण आधी फी किती ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) 2003 साली ही शाळा सुरू झाली. ही को-एज्युकेशन शाळा असून इथे हॉस्टेल नाही, फक्त डे-स्कॉलर सुविधा आहे.

शाळेने फीबाबत अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, विविध रिपोर्ट्सनुसार फीचा अंदाज असा आहे:

* ॲप्लिकेशन फी: साधारण 5,000 रुपये (नॉन-रिफंडेबल).

* LKG ते 7 वी: वर्षाला सुमारे 1.7 लाख रुपये.

* 8 वी ते 10 वी (ICSE): वर्षाला सुमारे 1.85 लाख रुपये (हा पॅटर्न हळूहळू बंद होतोय).

* 8 वी ते 10 वी (केंब्रिज IGCSE): वर्षाला 4.48 लाख ते 5.9 लाख रुपये.

* 11 वी आणि 12 वी (IB डिप्लोमा): वर्षाला सुमारे 9.65 लाख रुपये.

ही फी अंदाजित असून त्यात बदल होऊ शकतो. ॲडमिशन घेण्यापूर्वी शाळेत जाऊन लेखी माहिती घेणं कधीही चांगलं.

Related Articles

Related image1
Anant Ambani : अनंत अंबानी आता 'प्रोफेसर' झाले, पण ते न्यूकॅसल युनिव्हर्सिटीत नेमकं काय शिकवणार?
34
शाळेत कोणत्या सुविधा मिळतात?
Image Credit : dais.edu.in

शाळेत कोणत्या सुविधा मिळतात?

या शाळेत प्रत्येक वर्गाची फी वेगळी आहे. इंटरनॅशनल बोर्डाकडे गेल्यावर फी वाढते. 8 वी ते 10 वीसाठी केंब्रिज IGCSE आणि 11 वी-12 वीसाठी IB डिप्लोमा प्रोग्राम आहे. यासाठी खास ट्रेनिंग घेतलेले शिक्षक, प्रोजेक्ट्स आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज असतात, त्यामुळे फी जास्त असते.

अभ्यासासोबतच इतर गोष्टींसाठी शाळेत भारी सुविधा आहेत.

क्लासरूम आणि लॅब: 1.3 लाख स्क्वेअर फुटांचा कॅम्पस, 60 पेक्षा जास्त एसी क्लासरूम आणि सायन्स लॅब आहेत.

लायब्ररी: 40,000 पेक्षा जास्त पुस्तके आणि डिजिटल बुक्स उपलब्ध आहेत.

कला आणि संगीत: आर्ट, म्युझिक, भाषा आणि कॉम्प्युटरसाठी खास खोल्या आहेत. कार्यक्रम करण्यासाठी खास जागाही आहे.

खेळ: 2.3 एकरांचं मैदान, बास्केटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट आणि योगा रूम आहे.

इतर सुविधा: मेडिकल सेंटर, ऑडिओ-व्हिज्युअल ऑडिटोरियम आणि दोन डायनिंग हॉल आहेत, जिथे शाकाहारी जेवण आणि स्नॅक्स मिळतात.

44
ॲडमिशन कसं मिळवायचं?
Image Credit : dais.edu.in

ॲडमिशन कसं मिळवायचं?

बाहेरच्या शाळेतून येणाऱ्या मुलांना सहसा 8 वी आणि 11 वी मध्ये ॲडमिशन मिळतं. पण जागा आणि त्या वर्षीच्या नियमांवर हे अवलंबून असतं.

8 वी ॲडमिशन: नोव्हेंबरमध्ये एंट्रन्स टेस्ट होते. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह सेशन असतं. यात मुलांना स्वतःचे विचार मांडण्यासाठी 500 शब्दांचा एक लेखही लिहावा लागतो.

11 वी ॲडमिशन: आधी मल्टिपल चॉईस (MCQ) टेस्ट आणि नंतर थेअरी टेस्ट होते. शेवटी इंटरॅक्टिव्ह सेशन घेतलं जातं.

लहान वर्गांसाठी: ॲप्लिकेशन दिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांसोबत चर्चा करून ॲडमिशन दिलं जातं.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मुंबई बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(54.0 ov) 99 & 156/4
Day 4
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Marco Rubio In India : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारतात; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट
Recommended image2
Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफवरील हल्ला, शूटर्ससाठी पोलिसांचा 'प्लॅन बी'
Recommended image3
Mumbai Fire: दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमधील हॉटेलला भीषण आग
Recommended image4
Mumbai Local: कांदिवलीत महिला डब्यात शिरला शर्टलेस तरुण, प्रवाशांचा संताप
Recommended image5
Akasa Air Viral Video : मुंबई एअरपोर्टवर प्रवाशाची बॅग फुटली, अकासा एअरच्या कर्मचाऱ्यांच्या उत्तराने संताप
Related Stories
Recommended image1
Anant Ambani : अनंत अंबानी आता 'प्रोफेसर' झाले, पण ते न्यूकॅसल युनिव्हर्सिटीत नेमकं काय शिकवणार?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved