राज्यात पावसाचे प्रमाण वाढत असून, मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने २४ तास धोक्याचे असल्याचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Mumbai: राज्यात पाऊसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. त्यामुळं शेतकरी आणि प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे. आज सकाळपासून मुंबई आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाळा सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रामधील आणि किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ढगाळ हवामान राहणार 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १६ जुलै रोजी ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने २४ तास धोक्याचे असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नये असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

कोणत्या भागात जास्त पाऊस पडणार? 

मुंबईमध्ये १६ जुलै रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 16 जुलै रोजी मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या काळात ४०-५० किमी वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार कायम 

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, नवीन मुंबई, पालघर आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे आणि आवश्यक असल्यास छत्री आणि रेनकोट सोबत बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

समुद्रात भरती ओहोटी झाली सुरु 

समुद्रात भरती आणि ओहोटीला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांत वेगवान वाऱ्यासोबत चक्री वाऱ्यांची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा प्रवास दक्षिणेकडे झुकलेला असल्यामुळे हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, आज समुद्रात भरती व ओहोटी यांचा प्रभाव जाणवणार असून, भरती दुपारी ३.१९ वाजता सुमारे ४.४१ मीटरपर्यंत, तर ओहोटी रात्री ९.११ वाजता सुमारे १.३३ मीटरपर्यंत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.