अहिल्यानगरमधील केडगावमध्ये सोमवारी रात्री एका महिलेवर तिच्या नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. आरोपींनी महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केले असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतर तिघे फरार आहेत.

अहिल्यानगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केडगावमध्ये एक दुर्घटना घडली आहे. सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, मंगळवारी सकाळी कोतवाली पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक माहितीनुसार आरोपी आणि महिलेमध्ये आधी भांडण झालं होत.

आरोपीने केला लैंगिक अत्याचार 

आरोपीने भांडण केल्याचा राग ठेवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. उर्वरित तीन आरोपींनी तिला मारहाण करून गंभीर जखमी केलं. विशेष म्हणजे, आरोपी हे पीडितेचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

गुन्हेगारांना करण्यात आलं अटक 

या प्रकरणी डाळखुष काळे, अक्षय काळे, विनेश काळे आणि मोनेश उर्फ टाटा चव्हाण या चौघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी यापैकी डाळखुष काळे या आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर तिघे आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.