- Home
- Maharashtra
- महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज वाचून दाताला बसेल कडकी
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज वाचून दाताला बसेल कडकी
राज्यात पोषक वातावरणामुळे जोरदार पाऊस सुरू झाला असून हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज वाचून दाताला बसेल कडकी
पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भात पाऊस होणार
मराठवाडा आणि कोकणात देखील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२६ ऑक्टोबरला हवामान कस राहणार?
२६ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर संध्याकाळी 40 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मिळाला येलो अलर्ट
कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील ३ दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी असं अवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
उत्तर महाराष्ट्रात काय परिस्थिती राहणार?
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव सह नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला 26 तारखेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात वाढला पावसाचा जोर
मराठवाड्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हिंगोली आणि नांदेड वगळता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.