rain: राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत असून तो तुरळक स्वरूपाचा आहे. अनेक ठिकाणी तर अजूनही दुष्काळी परिस्थिती असल्याचं दिसून आलं आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात मात्र पावसाला पोषक हवामान तयार झाल्याचं दिसून आलं आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह थोडा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२४ तासांमध्ये कुठं किती होत तापमान?
आता आपण २४ तासांमध्ये कुठं किती तापमान होत त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. गुरुवारी सकाळी २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील सर्वात नीचांकी तापमान नोंदवलं गेलं. राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप दिली आहे. तरी काही भागात मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे.
