भाजपा नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंना मॉर्फ केलेले म्हटले आहे आणि याप्रकरणी मुंबईत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी शिवसेना फुटीवर आणि संजय राऊत यांच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, शिवसेना वर्धापन दिनानिमित्त राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे गिरीश महाजन यांची विरोधकांकडून कोंडी केली जात आहे. यावर आता महाजन यांनीच बुलढाणा येथून प्रतिक्रिया दिली आहे. माझा फोटो मॉर्फ केलेला असून यासंदर्भात मी मुंबईला गेल्यानंतर उद्या तक्रार देखील दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शिवसेना फुटीवर दिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे खासदार कसे फुटले याबद्दल महाजन यांनी पत्रकारांना परत प्रश्न विचारला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाजनांचा यावेळी समाचार घेतला आहे. राऊत यांनी म्हटलं होत की, माझ्याकडे फक्त एक दिवसासाठी ईडी, सीबीआय द्या मी गिरीश महाजन यांना फोडून दाखवतो असं यांनी म्हटलं होत.

महाजन काय म्हणाले?

त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे. ते नेहमीच बोलतात, त्यामुळं मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केल. या व्हायरल प्रकरणात मुंबईत महाजन लवकरच तक्रार दाखल करणार आहेत.

शिवसेना वर्धापन दिन साजरा करणार

आज शिवसेना वर्धापन दिन साजरा करणार आहे. शिवसेना गटात बंडखोरी झाली आहे. याबद्दल आज उद्धव ठाकरे काय बोलणार, शिंदे गट की भाजप कोणावर टीका करणार याकडं सामान्य माणसाचं लक्ष लागून राहील आहे. शिवसेना ठाकरे गटातून ६ खासदारांनी बंडखोरी केली आहे.