MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'; लांब पल्ल्याचा प्रवास होणार हायटेक

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'; लांब पल्ल्याचा प्रवास होणार हायटेक

New Sleeper Vande Bharat Train: रेल्वेच्या ताफ्यात 2 नवीन स्लीपर वंदे भारत गाड्या दाखल होणारय. या गाड्या मार्च २०२६ पर्यंत सेवेत येण्याची शक्यता असून त्या दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता यांसारख्या प्रमुख मार्गांवर धावतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 21 2026, 04:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'
Image Credit : X

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आता आणखी दोन नवीन स्लीपर वंदे भारत गाड्या दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हावडा ते कामाख्या या पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, आता रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाला मोठी गती दिली आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत दोन नवीन रेक प्रवाशांच्या सेवेत येण्याची दाट शक्यता आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार!
Image Credit : X

प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार!

सध्याच्या वंदे भारत गाड्या प्रामुख्याने बसून प्रवासासाठी (Chair Car) आहेत, मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 'स्लीपर' मॉडेल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

चेन्नईमध्ये निर्मिती: या गाड्यांची बांधणी चेन्नई येथील रेल्वे कारखान्यात युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत तिसरा आणि चौथा रेक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आरामदायी प्रवास: प्रवाशांच्या सूचना लक्षात घेऊन या नवीन कोचेसमध्ये आधुनिक बदल केले जात आहेत. 

Related Articles

Related image1
नागपुरात बारावीचा पेपर फुटला; फिजिक्स-केमिस्ट्री प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर
Related image2
मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं; रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे जळगाव-भुसावळकरांची चांदी
35
या मार्गांवर सुरू होणार 'स्लीपर' सेवा?
Image Credit : Getty

या मार्गांवर सुरू होणार 'स्लीपर' सेवा?

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर या गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. यामध्ये प्रामुख्याने

दिल्ली - मुंबई

दिल्ली - कोलकाता

दिल्ली - श्रीनगर

दिल्ली - अमृतसर 

45
भविष्यातील 'पॅन्ट्री कार' आणि २४ कोचेसचे नियोजन
Image Credit : stockPhoto

भविष्यातील 'पॅन्ट्री कार' आणि २४ कोचेसचे नियोजन

केवळ १६ कोचेसवर न थांबता, भविष्यात प्रवाशांच्या सोयीसाठी २४ कोचेस आणि इन-बिल्ट पॅन्ट्री कार असलेल्या वंदे भारत ट्रेन तयार करण्याची रेल्वेची योजना आहे. यामुळे राजधानी आणि एक्स्प्रेस गाड्यांना एक सक्षम आणि वेगवान पर्याय उपलब्ध होईल. 

55
अंतिम मुदत आणि आव्हाने
Image Credit : stockPhoto

अंतिम मुदत आणि आव्हाने

करारानुसार मार्चपर्यंत १० रेक देण्याचे नियोजन होते, मात्र तांत्रिक बाबींमुळे सध्या दरमहा एक रेक या गतीने उत्पादन सुरू राहणार आहे. त्यामुळे मार्च २०२६ पर्यंत दोन नवीन गाड्या ताफ्यात येणे निश्चित मानले जात आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
दिल्लीत विद्यार्थ्यांचा एल्गार, 'कॉक्रोच' आंदोलनाच्या वेळी नेमकं काय घडलं?
Recommended image2
नवी मुंबई विमानतळाला ऐतिहासिक ओळख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण
Recommended image3
महागाईचा फटका सलून सेवांवरही; महाराष्ट्रात दाढी-कटिंगच्या दरात 20 टक्के वाढ, सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका
Recommended image4
Pune : पुण्यातील जत्रेत 'मेड इन पाकिस्तान' चादर, धुतल्यावर सत्य समोर आल्याने खळबळ!
Recommended image5
अमित ठाकरे यांचे कॉकरोच जनता पार्टीबद्दल केलं मोठे वक्तव्य, '...तर मला आनंद होईल'
Related Stories
Recommended image1
नागपुरात बारावीचा पेपर फुटला; फिजिक्स-केमिस्ट्री प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर
Recommended image2
मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं; रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे जळगाव-भुसावळकरांची चांदी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved