सार
पुणे येथे गीताभक्ती अमृत मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहोत्सवाला काही प्रतिष्ठित साधू-संतांनी उपस्थिती लावली. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमादरम्यान, मुघलांमुळे नव्हे शिवाजी महाराजांमुळे आमची ओळख असल्याचे विधान केले आहे.
UP Yogi Adityanath Maharashtra Visit : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (11 फेब्रुवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे येथील वेदश्री तपोवन मठात स्वामी गोविंद देव गिरी महारांची योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. याशिवाय आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या ‘गीताभक्ती अमृत मोहोत्सवा’ ला देखील योगी आदित्यनाथ यांनी उपस्थिती लावली.
गीताभक्ती कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
गीताभक्ती मोहोत्सव कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, "तुम्ही भाग्यवान आहात की, तुम्हाला संतांचे आशीर्वाद मिळाले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील जनताही भाग्यवान आहे. शेकडो वर्षांपासून तुम्हाला संतांचे आशीर्वाद मिळतायेत."
शिवाजी महाराजांबद्दल योगी आदित्यनाथ यांनी केले हे विधान
योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, “समर्थगुरु रामदास यांनी महाराष्ट्रातूनच छत्रपती शिवाजी महाराजांची निर्मिती केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतभर जे वैभव पसरवले होते, त्या काळाचा विचार करा. औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबाला तडफण्यासाठी आणि मरणासाठी असेच सोडून दिले की, आजपर्यंत त्याला कोणीही विचारत नाहीय.”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. या दोघांमध्ये संवादही झाला.
आणखी वाचा :