सार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. दसरा मेळाव्यात त्यांनी विरोधकांवर आणि शिंदे गटावर टीका केली होती. राहुल गांधींशी झालेल्या भेटीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाल्याची चर्चा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यात आलं आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात हे उपचार करण्यात आल्याची माहिती समजली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती. या तपासणीच्या दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानंतर हे ऑपरेशन झाले आहे. त्यांच्यावर २०१२ मध्ये अशा प्रकारची ऑपरेशन करण्यात आलं होत. 

दसरा मेळाव्यातून टीका केली होती - 
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. त्यांनी विरोधी पक्षावर आणि एकनाथ शिंदे गटावर ही टीका केली होती. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला धारावी पुनर्विकास प्रकल्पाची काम भेटली आहेत. येथील निविदा रद्द करू नये असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होत. त्यांनी यावेळी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. 

कोण बनणार मुख्यमंत्री? - 
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये दिल्ली येथे बोलणं झालं असून त्यांच्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला असल्याचं एका पत्रकारानं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला गेले होते, त्याचवेळी हे ठरल्याचं सांगितलं गेलं आहे. त्यामुळं आता कोण होईल मुख्यमंत्री हा प्रश्न सुटला का हे कोडे मात्र जनतेच्या मनात पडले आहे.