ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पावसामुळे सण साजरा करण्यात अडथळे येत आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टी बघायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात तर पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांमध्ये तर पाऊस अक्षरश: मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत असल्यामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ होत आहे.
ठाणे आणि पालघर रेड अलर्ट जारी
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये तीन तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या अलर्टनुसार या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून ठाणे जिल्ह्यात रिमझिप पाऊस सुरु होता. पण दुपारनंतर मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे.
पाऊस जोरात पडत असल्यामुळं रस्त्यावरचे वाहन दिसत नाही. नागरिकांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झालं आहे. पावसाचा वेग असाच राहिला तर ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचं केलं अवाहन
हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. तसेच आवश्यकता असेल तर घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे. विशेष म्हणजे सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. आज गणपतीचा शेवटचा दिवस असल्यामुळं सत्यनारायणाची महापूजा केली जात आहे. पावसामुळे सण साजरा करण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे.
येलो अलर्ट केला जारी
राज्यातील मुंबई शहर, बीड, धाराशिव, रत्नागिरी, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून सर्व परिस्थितीची काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.
