राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. आता फक्त ऊन सावल्यांचा खेळ दिसून येत आहे. काही भागात पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावत आहे. आता सगळीकडं पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी लावत आहेत. आता जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

ऑरेंज अलर्ट केला जारी? 

आता सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथ्यासह येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर सोलापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर येथे येलो अलर्ट जारी केला आहे.

जोरदार पावसाचा अंदाज केला व्यक्त 

बुधवारी गोंदिया, गडचोरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.