सोशल मीडियावर गाजलेल्या 'आप्पा' गाण्यावरून भरला शाळेत वर्ग?

| Published : Aug 26 2024, 01:42 PM IST / Updated: Aug 26 2024, 01:43 PM IST

appa songs

सार

सोशल मीडियावर प्रचंड गाजलेल्या 'आप्पा' गाण्यावर आधारित एका शाळेत वर्ग घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गाण्यावरून प्रश्न विचारले असून त्यांची उत्तरे ऐकून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर आप्पाचा विषय लई हार्ड आहे, हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओवर अनेक जणांनी रिल्स व्हिडीओ बनवल्या असल्याचं सोशल मीडियातून दिसून आलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता याच व्हिडिओबद्दल एका शाळेत क्लास घेतला जात असून तेथील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे? 
व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेतील मुलांना त्यांचे शिक्षक आप्पा या गाण्यावर प्रश्न विचारताना दिसून येत आहेत. या प्रश्नातून आप्पाचा विषय काय आहे? आप्पा काय करू शकतात, आप्पांचे कुठे लक्ष नाही अशा स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले आणि त्यांना याबद्दलचे उत्तर सांगा असेही सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थी मोठ्या उस्फुर्ततेने प्रश्नांची उत्तर देत असल्याचे दिसून आले आहे. 

शिक्षण वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना आपलं गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आहे असं सांगतात. त्यानंतर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि उत्तर द्या अशी म्हटलं जात. त्यानंतर वर्गात बसलेली सर्व विद्यार्थी सरांच्या प्रश्नांची उत्तर मोठ्या उत्साहाने देत असल्याचं दिसून आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार शिक्षण आणि त्यावरून सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. 
आणखी वाचा - 
पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये नरसंहार, पंजाबमधील 23 लोकांची हत्या, भयानक व्हिडिओ