MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • आता नुसतं आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही! लालपरीच्या प्रवासासाठी एसटीचा 'हा' नियम बदलला; महिला आणि ज्येष्ठांनी काय करावे?

आता नुसतं आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही! लालपरीच्या प्रवासासाठी एसटीचा 'हा' नियम बदलला; महिला आणि ज्येष्ठांनी काय करावे?

एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी नियमात मोठा बदल केला आहे. महिलांना मिळणारी ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणारा मोफत प्रवास आता आधार कार्ड दाखवून मिळणार नाही, त्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 21 2026, 05:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
आता नुसतं आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही! लालपरीच्या प्रवासासाठी एसटीचा 'हा' नियम बदलला
Image Credit : Getty

आता नुसतं आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही! लालपरीच्या प्रवासासाठी एसटीचा 'हा' नियम बदलला

पुणे : जर तुम्ही एसटी बसने सवलतीच्या दरात प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत महिलांना मिळणारी ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांचा मोफत प्रवास केवळ आधार कार्ड दाखवून मिळत होता. मात्र, आता एसटी महामंडळाने नियमावलीत मोठा बदल केला असून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) अनिवार्य केले आहे. हे कार्ड नसेल, तर तुम्हाला तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागणार आहेत. 

25
नेमका बदल काय आणि सक्ती का?
Image Credit : social media

नेमका बदल काय आणि सक्ती का?

एसटी प्रशासनाच्या नव्या निर्णयानुसार, प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही.

डिजिटल ट्रॅकिंग: सवलतींचा गैरवापर रोखण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही डिजिटल प्रणाली लागू केली जात आहे.

कॅशलेस प्रवास: हे कार्ड एक प्रकारचे 'प्री-पेड वॉलेट' असून यामुळे प्रवाशांना रोख पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही. 

Related Articles

Related image1
मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं; रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे जळगाव-भुसावळकरांची चांदी
Related image2
Mumbai Local: मुंबईकरांनो सावधान! रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक तपासा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचा होणार खोळंबा
35
एनसीएमसी (NCMC) कार्डचे दर आणि नियम
Image Credit : social media

एनसीएमसी (NCMC) कार्डचे दर आणि नियम

हे कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांना काही पैसे मोजावे लागतील.

नवीन कार्ड: नवीन कार्डासाठी १९९ रुपये शुल्क असेल.

जुन्या कार्डवर सवलत: ज्यांच्याकडे आधीचे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांना ते परत केल्यास नवीन कार्ड १४९ रुपयांत मिळेल.

रिचार्ज सुविधा: कार्डमध्ये किमान १०० रुपयांचा बॅलन्स असणे आवश्यक आहे. तुम्ही ५० रुपयांच्या पटीत हे कार्ड रिचार्ज करू शकता. 

45
प्रवाशांच्या मनात शंकांचा डोंगर
Image Credit : our own

प्रवाशांच्या मनात शंकांचा डोंगर

आधार कार्डच्या साध्या प्रक्रियेमुळे आतापर्यंत महिला आणि ज्येष्ठांना प्रवास सोयीचा वाटत होता. मात्र, कार्ड सक्तीमुळे प्रवाशांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे.

गुंतागुंतीची प्रक्रिया: कार्ड काढण्यासाठी नोंदणी केंद्रावर जाणे आणि ते वारंवार रिचार्ज करणे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी कठीण जाऊ शकते.

तांत्रिक अडथळे: कार्ड मशीन न चालल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास सवलत मिळणार की नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

55
थोडक्यात काय लक्षात ठेवावे?
Image Credit : our own

थोडक्यात काय लक्षात ठेवावे?

जर तुम्ही ५०% किंवा १००% सवलतीचे मानकरी असाल, तर तातडीने जवळच्या आगारातून तुमचे NCMC कार्ड काढून घ्या. आधार कार्ड आता केवळ 'ओळखपत्र' म्हणून चालेल, पण सवलतीसाठी 'स्मार्ट कार्ड' असणेच आता बंधनकारक आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'; लांब पल्ल्याचा प्रवास होणार हायटेक
Recommended image2
मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं; रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे जळगाव-भुसावळकरांची चांदी
Recommended image3
नागपुरात बारावीचा पेपर फुटला; फिजिक्स-केमिस्ट्री प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर
Recommended image4
शिमग्यासाठी कोकणवासीयांना मोठी भेट; मुंबई- विजयदुर्ग समुद्री फेरी 1 मार्चपासून सुरू
Recommended image5
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुका जाहीर; महाराष्ट्रातील 7 जागांवर 16 मार्चला मतदान
Related Stories
Recommended image1
मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं; रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे जळगाव-भुसावळकरांची चांदी
Recommended image2
Mumbai Local: मुंबईकरांनो सावधान! रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक तपासा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचा होणार खोळंबा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved