MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Government Schemes : घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक आधार; राज्य सरकारची खास योजना काय?

Maharashtra Government Schemes : घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक आधार; राज्य सरकारची खास योजना काय?

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली जाते. याचा लाभ कसा घ्यायचा, पात्रता काय आणि संपूर्ण अर्जप्रक्रिया सविस्तर जाणून घ्या.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 13 2026, 04:46 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
Image Credit : Asianet News

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवते. अशा परिस्थितीत गरीब कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्ज कुठे करायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेला मुख्य उद्देश
Image Credit : Chatgpt

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेला मुख्य उद्देश

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबवली जाते. कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या व्यक्तीच्या उत्पन्नावर प्रामुख्याने अवलंबून होता, अशा प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. मुख्यत्वे दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना अशा कठीण प्रसंगी आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Related image1
Government Schemes: या सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक, होईल बंपर फायदा!
Related image2
Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या या ५ भन्नाट स्कीम्स, जिथे मिळतात ८.२% पर्यंत रिटर्न्स
38
योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?
Image Credit : Asianet News

योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?

या योजनेंतर्गत पात्र कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी ही मदत फायदेशीर ठरू शकते.

48
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी पात्रता काय?
Image Credit : Google

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी पात्रता काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आणि संबंधित कुटुंबाने शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. अर्जदार हा मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य किंवा तिच्यावर अवलंबून असलेला व्यक्ती असावा.

3. संबंधित कुटुंब दारिद्र्यरेषेखालील (BPL) असणे आवश्यक आहे.

4. मृत्यू झालेल्या कुटुंबप्रमुखाचे वय मृत्यूसमयी १८ ते ५९ वर्षांच्या दरम्यान असावे.

5. मृत व्यक्ती ही कुटुंबातील प्रमुख कमावती व्यक्ती असणे आवश्यक आहे.

58
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
Image Credit : freepik/AI

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

1. अर्जदाराचे ओळखपत्र – आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.

2. मृत व्यक्तीचे ओळखपत्र – आधार कार्ड.

3. मृत्यूचा दाखला.

4. एफआयआरची प्रत (FIR Copy).

5. मृत व्यक्तीच्या वयाचा पुरावा.

6. दारिद्र्यरेषेखालील (BPL) प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड.

7. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).

8. रहिवासी किंवा पत्त्याचा पुरावा.

9. बँक पासबुक किंवा बँक खात्याचा तपशील.

10. संबंधित अधिकाऱ्यांनी मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे.

68
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज कसा करावा?
Image Credit : Asianet News

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज कसा करावा?

अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

अर्ज घ्या

इच्छुक अर्जदाराने कार्यालयीन वेळेत आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे भेट द्यावी. संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेसंबंधित अर्ज घ्यावा.

अर्ज व्यवस्थित भरा

अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. आवश्यक असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा. तसेच मागितलेल्या कागदपत्रांच्या प्रती स्वसाक्षांकित करून अर्जासोबत जोडाव्यात.

अर्ज जमा करा

संपूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करावा. अर्ज सादर करण्यासाठी कोणतीही दिलेल्या मुदतीचे पालन करावे.

अर्ज स्विकारल्याची पावती घ्या

अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्ज स्वीकारल्याची पावती घ्यावी. या पावतीवर अर्ज जमा केल्याची तारीख, वेळ आणि अर्जाचा विशिष्ट ओळख क्रमांक (असल्यास) नमूद असल्याची खात्री करावी.

78
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
Image Credit : Asianet News

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. पात्रता पूर्ण करणाऱ्या कुटुंबाला २० हजार रुपयांचे एकरकमी आर्थिक सहाय्य मिळते.

88
मृत व्यक्तीचे वय किती असणे आवश्यक आहे?
Image Credit : social media

मृत व्यक्तीचे वय किती असणे आवश्यक आहे?

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी मृत्यू झालेल्या प्रमुख कमावत्या व्यक्तीचे वय मृत्यूच्या वेळी किमान १८ वर्षे आणि अधिकाधिक ५९ वर्षे असणे आवश्यक आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Nashik Lift Accident : नाशिकमध्ये लिफ्ट कोसळली, ६ जण अडकले; थरारक व्हिडिओ
Recommended image2
Nagpur Viral Video : नागपुरात रिल्ससाठी धावत्या दुचाकीवरून रॉकेट फोडले, 4 जण ताब्यात
Recommended image3
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी चौकशीची मागणी
Recommended image4
Ajit Pawar Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा, काँग्रेस नेत्याची मागणी
Recommended image5
Demonetisation Anniversary : नोटाबंदीच्या दहा वर्षांनंतर देशाला काय मिळालं? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल
Related Stories
Recommended image1
Government Schemes: या सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक, होईल बंपर फायदा!
Recommended image2
Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या या ५ भन्नाट स्कीम्स, जिथे मिळतात ८.२% पर्यंत रिटर्न्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved