Shiv Jayanti 2026 : 396 व्या शिवजयंतीनिमित्त राज्यभर जल्लोषाचे वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय सोहळा पार पडला. 

Shiv Jayanti 2026 : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. किल्ले शिवनेरीवर मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी उसळली असून ढोल-ताशांच्या गजरात जन्मोत्सव सोहळा पार पडला. राज्यातील विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवनेरीवर शासकीय थाटात सोहळा

शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमांचा भव्य थाट पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पाळणा जोजवत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते शिवाई देवी मंदिरात अभिषेक पार पडला. शिवभक्तांनी गडावर जयघोष करत उत्सव साजरा केला.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

422 किल्ल्यांच्या नावांतून साकारले पोर्ट्रेट

कल्याण येथे संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी 422 किल्ल्यांच्या नावांतून शिवछत्रपतींचे तेजोमय पोर्ट्रेट साकारले. दोन दिवसांच्या परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा अनोखा कलाविष्कार शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

 तुळजाभवानी मंदिरात विशेष पूजन

धाराशिव येथील तुळजा भवानी मंदिर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. देवीच्या गाभाऱ्यात सिंहासन पूजा आणि शिवअभिषेक करण्यात आला. शिवभक्तांनी प्रदक्षिणा घालत जयघोष केला. महिलांचा सहभाग विशेषत्वाने लक्षवेधी ठरला.

सोलापुरात 5x8 फुटांची भव्य चित्रकृती

सोलापुरातील चित्रकार नितीन खिलारे यांनी शिवाजी महाराजांच्या मोहिमेनंतरच्या विजयी क्षणाचे 5 बाय 8 फुटांचे भव्य चित्र साकारले. किल्ला जिंकल्यानंतर महाराज पाहणी करत असल्याचा क्षण त्यांनी कॅन्वासवर जिवंत केला आहे. या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.