सार

संपूर्ण राज्याचे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. या मतदारसंघातील उमेदवार अखेर महाविकास आघाडीने ठरवला आहे.

संपूर्ण राज्याचे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. या मतदारसंघातील उमेदवार अखेर महाविकास आघाडीने ठरवला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना येथून लोकसभेचे तिकीट दिले जाईल, हे निश्चित झाले आहे. शशिकांत शिंदे हे कधी उमेदवारी अर्ज भरतील हे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. 

शशिकांत शिंदे भरणार सातारा लोकसभेतून अर्ज - 
शशिकांत शिंदे हे सोमवारी 15 एप्रिलला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आघाडीचे नेते उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते आणि नेते कामाला लागणार आहेत. मागील वेळी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्रीनिवास पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते. 

शशिकांत शिंदे कोण आहेत? 
उदयनराजे भोसले यांनी येथून निवडणूक जिंकून आल्यानंतर राजीनामा दिला होता आणि त्यानंतर परत निवडणूक झाल्यावर श्रीनिवास पाटील यांच्याकडून उदयनराजे भोसले यांना हार पत्करावी लागली होती. शशिकांत शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. 
आणखी वाचा - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची का सोडली साथ? उद्धव ठाकरे नेत्यांना द्यायचे अशी वागणूक
पानाच्या दुकानावर झालेल्या भांडणातून महाराष्ट्रात झाला खून, नेमकं घडलं काय?