शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापैकी खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या मंत्र्याची भेट घेतल्याने ते चर्चेत आले आहेत, मात्र त्यांनी ही भेट मतदारसंघातील कामासाठी होती आणि याची कल्पना पक्षप्रमुखांना दिली होती असे स्पष्ट केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला ५ खासदार अनुपस्थिती राहिले होते. शिंदे गटाच्या केंद्रीय मंत्र्याची भेट घेतल्यामुळं खासदार संजय देशमुख चर्चेत आले आहेत. त्यांनी या भेटीमागची कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली होती, अशी माहिती दिली आहे.

किती खासदार होते अनुपस्थित
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीला जवळपास ४ खासदार अनुपस्थित होते. हे खासदार शिंदे सेनेत जातात का याकडं राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहील होत. बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. त्यामुळं संजय देशमुख हे चर्चेत आले आहेत.
मतदारसंघातील कामासाठी घेतली भेट
मतदारसंघातील कामाच्या संदर्भात आपण प्रतापराव जाधव यांची भेट घेतली अशी माहिती खा. संजय देशमुख यांनी दिली आहे. रविवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला संजय देशमुख यांनी ऑनलाईन उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी जाधव यांची भेट घेतल्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे.
पाच खासदार राहिले होते अनुपस्थित
पाच खासदार हे उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. रविवारी आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला गैरहजर राहिलेले संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर, मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीलाही गैरहजर होते. मात्र यापैकी फक्त नागेश पाटील हेच ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते असं सांगण्यात आलं आहे.


