सार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एखाद्या बँकेवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आरबीआयने पीएमसी बँक आणि येस बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी निर्बंध घातले होते. आता राज्यातील एका बँकेवर आरबीआयने बंदी घातली आहे.
Bank in Crisis : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) राज्यातील एका सहकारी बँकेवर बंदी घालत पैशांचे व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत. यामुळे नागरिकांना पुढील सहा महिने खात्यातून पैसे काढता येणार नाहीयेत. याशिवाय बँक नागरिकांना कर्ज अथवा अन्य पैशांसंबंधित व्यवहारही करू शकत नाही. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.
शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी
आरबीआयने राज्यातील शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Shirpur Merchants' Co-operative Bank) बंदी घातली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही पहिलीच वेळ नाही ज्यावेळी आरबीआयने एखाद्या बँकेवर बंदी घातली आहे. याआधीही आरबीआयने पीएमसी बँक आणि येस बँकेतून पैसे काढण्यासाठी काही निर्बंध घातले होते. खरंतर, आरबीआयने शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे घातली आहे.
ग्राहकांकडे काय आहे पर्याय?
एखाद्या बँकेवर आरबीआयकडून बंदी घातली गेल्यास ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यानुसार, बँक खातेधारकाजवळ पाच लाखांपर्यंतचे ठेव विमा कव्हर असते. यामध्ये त्या विशिष्ट बँकेतील त्यांच्या खात्यातील मुद्दल आणि व्याजाच्या रक्कमेचा समावेश असतो. याशिवाय विमा संरक्षण रक्कम सर्व ठेवींवर लागू असतो.
पैसे परत कधी मिळणार?
ठेव विमाअंतर्गत खातेधारकाला पाच लाख रुपायांपर्यंतची रक्कम 90 दिवसात काढता येऊ शकते. आरबीआयने म्हटलेय की, शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
आणखी वाचा :
समोसामध्ये भरले कंडोम, दगड आणि तंबाखू; पुण्यातील ऑटो कंपनीमधील किळसवाणा प्रकार उघडकीस
पानाच्या दुकानावर झालेल्या भांडणातून महाराष्ट्रात झाला खून, नेमकं घडलं काय?