कोकण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात भूस्खलनाची शक्यता आहे.

मुंबई – IMD ने कोकण, विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आगामी चार दिवसांत या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सावधानतेच्या सूचना

कोकण किनारपट्टीवरील गावांना, नदीकाठच्या भागांना आणि गिर्यारोहकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर अशी मोठी शहरं आणि उपनगरांमध्ये येलो अलर्ट असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे

भूस्खलन होण्याची दाट शक्यता मान्सून सुरुवातीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने घाट परिसरात भूस्खलन, पूर आणि वाहतूक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुखात्याच्या आदेशांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

महाराष्ट्रातील विविध भागात पाऊसाची माहिती खाली दिली आहे -

कोकण (Konkan): 

मुसळधार पावसाचा जोर कोकण विभागात – विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या ४-५ दिवसांत काही भागांत २०४ मिमी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. जोरदार वादळासह पाऊस कोसळत असून, किनारपट्टी भागांत पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra): 

मध्यम ते जोरदार पाऊस पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यांवर काही ठिकाणी १०० ते १५० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडाफार वाढण्याची शक्यता असून, कृषी आणि पाण्याच्या साठ्यांसाठी हे उपयुक्त ठरणार आहे.

मराठवाडा (Marathwada): 

पावसाळा उशीर आणि कमी प्रमाण औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे नाही. काही भागांत किरकोळ १५ ते ३० मिमी इतकाच पाऊस पडला आहे. शेतकरी वर्गाला पेरणीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भ (Vidarbha): 

विजांसह जोरदार सरी नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागांत एका दिवसात ७० ते १२० मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने याठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला असून, शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरतो आहे.