सार

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण महायुतीकडून अजूनही उमेदवार ठरत नसल्याचे चित्र आहे.

 

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण महायुतीकडून अजूनही उमेदवार ठरत नसल्याचे चित्र आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटाकडून इच्छुक असून छगन भुजबळ हे अजित पवार गटाकडून फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येथे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

राजाभाऊ वाजे कोण आहेत? 
राजाभाऊ वाजे हे सिन्नर विधानसभेचे आमदार म्हणून मागील टर्ममध्ये कार्यरत होते. त्यांची लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे यामध्ये खऱ्या अर्थाने मतदारसंघात ओळख आहे. महाविकास आघाडीने येथे वॉर रूम तयार केली असून तेथूनच खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे. राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे हे राजकारणात सक्रिय होते. 

वॉर रूम का उभारण्यात आली? 
वॉर रूमबाबत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "आजकालच्या युगात लोकांपर्यंत उमेदवाराची आणि त्याच्या ध्येय धोरणांची माहिती पोहचवणे आवश्यक असते. त्यामुळे येथे खासकरून या रूमची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत यामाध्यमातून राजाभाऊ वाजे यांची माहिती पोहचवली जाणार आहे. 
आणखी वाचा - 
काँग्रेसने लोकसभेसाठीचा जाहीरनामा केला प्रसिद्ध, पक्षाने सत्तेत आल्यास 25 गॅरंटी पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
RBI Monetary Policy 2024: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय ; रेपो दरात कोणताही बदल नसल्याने कर्जदारांना दिलासा