२० वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले, युतीची शक्यता वर्तवली जात असताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना युतीबाबत चर्चा न करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची चर्चा सुरू आहे.
शनिवारी पार पडलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. तब्बल २० वर्षानंतर एकाच राजकीय मंचावर दोघे भाऊ दिसून आले. ते दोघे एकत्र आल्यावर आता त्यांची निवडणुकीत युती होते का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील होतं. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना युतीबाबत कोणतीही चर्चा करू नका असे आदेश दिले आहेत.
दोन्ही पक्षांमध्ये युतीची होती शक्यता
दोनही पक्षांमध्ये आता एकत्र आल्यावर आता त्यांची निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती पण राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिला आहे. मौन राखा आणि कोणत्याही प्रकारच्या चर्चा करू नका असं राज यांनी म्हटलं आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने युती संदर्भात कोणतंही वक्तव्य करायचं झाल्यास आधी माझी परवानगी घ्या, असे निर्देश राज यांनी दिले आहे.
युतीची वाढली भीती
राज ठाकरे यांच्या नव्या सूचनेमुळे या चर्चांवर मर्यादा येणार असून, पक्षांतर्गत रणनीती अंतिम होईपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर येणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असून कार्यकर्त्यांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वांना यांच्यात युती होते का हा प्रश्न पडला आहे. लवकरच या युतीबद्दल माहिती सर्वांना समजणार आहे.
