- Home
- Maharashtra
- Rain Alert : पावसाचे पुन्हा मोठे संकट येणार, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
Rain Alert : पावसाचे पुन्हा मोठे संकट येणार, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
Rain Alert : भारतीय हवामान विभागाने देशभरात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पूर्वोत्तर भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर महाराष्ट्रात देखील पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

चक्रीवादळानंतर हवामानाचा पारा बदलला
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोथा चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मात्र वातावरणात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये अतिमुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर IMD कडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वोत्तर भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पूर्वोत्तर राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा इशारा असलेले राज्य: अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा. दुसरीकडे दक्षिण भारतात आंध्र प्रदेशासह इतर राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राजस्थानातही ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे IMD ने सांगितले आहे.
महाराष्ट्रात येलो अलर्ट; पावसाचा जोर कायम
महाराष्ट्रात पुढील एक ते दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात वादळी वारे; ४ जिल्ह्यांना हाय अलर्ट
मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असून नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगरमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात पावसाचा पुढील इशारा
गेल्या काही महिन्यांत अतिवृष्टीने झोडपून निघालेल्या मराठवाड्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. शेतीचे मोठे नुकसान झालेल्या या भागात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

