MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • गावी जाणाऱ्यांची चंगळ! मध्य रेल्वे धावणार २,०१२ उन्हाळी स्पेशल गाड्या; पुणे-मुंबईसह 'या' शहरांना मोठा दिलासा

गावी जाणाऱ्यांची चंगळ! मध्य रेल्वे धावणार २,०१२ उन्हाळी स्पेशल गाड्या; पुणे-मुंबईसह 'या' शहरांना मोठा दिलासा

summer special trains: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०१२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या पुणे, मुंबई, सोलापूर, नागपूर यांसारख्या शहरांना जोडणार असून पुणे विभागातून सर्वाधिक गाड्यांचे नियोजन करण्यात आले. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 23 2026, 07:49 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
गावी जाणाऱ्यांची चंगळ! मध्य रेल्वे धावणार २,०१२ उन्हाळी स्पेशल गाड्या
Image Credit : Asianet News

गावी जाणाऱ्यांची चंगळ! मध्य रेल्वे धावणार २,०१२ उन्हाळी स्पेशल गाड्या

पुणे: मे महिना आणि उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे हक्काने गावी जाण्याचे दिवस! मात्र, या काळात रेल्वेच्या कन्फर्म तिकिटासाठी होणारी ओढाताण आता कमी होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) तब्बल २ हजार १२ विशेष उन्हाळी गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे, मुंबई, सोलापूर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
पुणे विभागावर विशेष भर
Image Credit : ANI

पुणे विभागावर विशेष भर

पुणे, हडपसर आणि दौंड येथून सर्वाधिक १,०१३ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार अतिरिक्त ५६ फेऱ्याही सोडल्या जाणार आहेत. 

Related Articles

Related image1
एसटीच्या ताफ्यात 'राजमाता जिजाऊ' अवतरणार! ३००० नव्या स्मार्ट बसेस धावणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Related image2
पर्यटकांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत गुजरातला जाणं होणार सोपं; रेल्वेकडून 'या' १० विशेष गाड्यांची घोषणा
37
प्रमुख मार्गांचे वेळापत्रक आणि नियोजन
Image Credit : Social Media

प्रमुख मार्गांचे वेळापत्रक आणि नियोजन

१. पुणे – कोल्हापूर – पुणे (दररोज)

कोल्हापूरला जाणाऱ्यांसाठी दररोज विशेष गाडी धावणार असून याच्या एकूण १८४ फेऱ्या होतील.

गाडी क्र. ०१०२३: पुणे येथून रात्री ९:५० ला सुटेल (पहाटे ५:०८ ला कोल्हापूर पोहोचेल).

गाडी क्र. ०१०२४: कोल्हापूर येथून रात्री ११:३० ला सुटेल (पहाटे ४:४५ ला पुणे पोहोचेल).

थांबे: सासवड रोड, जेजुरी, सातारा, कराड, सांगली, मिरज. 

47
२. हडपसर – हरंगुळ – हडपसर (विशेष गाडी)
Image Credit : South Western Railways - SWR

२. हडपसर – हरंगुळ – हडपसर (विशेष गाडी)

कालावधी: १५ एप्रिल ते १५ जुलै २०२६.

वेळ: हडपसरवरून सकाळी ६:२० ला सुटेल, तर हरंगुळवरून दुपारी ३:०० वाजता परतीचा प्रवास सुरू करेल.

थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव. 

57
३. परराज्यात जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन
Image Credit : AI Generated Photo

३. परराज्यात जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन

उत्तर भारत आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही खास सोय करण्यात आली आहे.

पुणे – गोरखपूर: ३२ फेऱ्या.

पुणे – दानापूर (दैनिक): १८४ फेऱ्या.

पुणे – नागपूर (साप्ताहिक): ५४ फेऱ्या.

पुणे – गाझीपूर सिटी: ८ फेऱ्या. 

67
इतर महत्त्वाचे मार्ग
Image Credit : AI Generated Photo

इतर महत्त्वाचे मार्ग

दौंड – कलबुर्गी: १८३ फेऱ्या (अनारक्षित गाडी).

सोलापूर – दौंड: १८४ फेऱ्या (दैनिक).

मुंबई (LTT) – सोलापूर: २६ फेऱ्या (साप्ताहिक - २१ एप्रिलपासून). 

77
प्रवाशांसाठी टीप
Image Credit : iSTOCK

प्रवाशांसाठी टीप

या विशेष गाड्यांचे बुकिंग रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर आणि आरक्ष खिडक्यांवर सुरू झाले आहे. सुट्ट्यांचे नियोजन करण्यापूर्वी वेळेची खातरजमा करून घ्या, जेणेकरून ऐनवेळी धावपळ होणार नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Manoj Jarange Patil : ‘मला चर्चा नको, अंमलबजावणी हवी’; 30 मेपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार – मनोज जरांगे
Recommended image2
CNG Price in Maharashtra : सीएनजी दरवाढीचा आणखी एक झटका! पुण्यात गॅस महागला, पेट्रोल-डिझेल पाठोपाठ वाहनचालकांची चिंता वाढली
Recommended image3
'राजा शिवाजी'साठी मुख्यमंत्र्यांचा फोन; रितेश देशमुख झाला भावूक
Recommended image4
जळगाव सराफा बाजारात मोठी घसरण, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
Recommended image5
राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘वादळ’; तटकरे नाराज, प्रफुल पटेल गैरहजर, पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
Related Stories
Recommended image1
एसटीच्या ताफ्यात 'राजमाता जिजाऊ' अवतरणार! ३००० नव्या स्मार्ट बसेस धावणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Recommended image2
पर्यटकांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत गुजरातला जाणं होणार सोपं; रेल्वेकडून 'या' १० विशेष गाड्यांची घोषणा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved