MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • पर्यटकांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत गुजरातला जाणं होणार सोपं; रेल्वेकडून 'या' १० विशेष गाड्यांची घोषणा

पर्यटकांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत गुजरातला जाणं होणार सोपं; रेल्वेकडून 'या' १० विशेष गाड्यांची घोषणा

Mumbai to Gujarat summer special trains: प्रवाशांची उन्हाळी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवरून गुजरातच्या विविध शहरांसाठी १० समर स्पेशल ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या एप्रिल ते जुलै २०२६ दरम्यान धावणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 23 2026, 04:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पर्यटकांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत गुजरातला जाणं होणार सोपं
Image Credit : Asianet News

पर्यटकांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत गुजरातला जाणं होणार सोपं

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की सर्वांना वेध लागतात ते सहलीचे! जर तुम्हीही या मे-जूनच्या सुट्टीत गुजरातच्या ऐतिहासिक वास्तू, समुद्रकिनारे किंवा कच्छचे रण पाहण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने (Western Railway) मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवरून गुजरातच्या विविध शहरांसाठी तब्बल १० समर स्पेशल ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

25
प्रवास सुखकर होणार; एप्रिलपासून सेवा सुरू
Image Credit : ANI

प्रवास सुखकर होणार; एप्रिलपासून सेवा सुरू

वांद्रे टर्मिनस ते गुजरात दरम्यान धावणाऱ्या या विशेष गाड्या २ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत उपलब्ध असतील. यामध्ये भावनगर, गांधीधाम, भुज, वेरावल आणि उधना अशा महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. 

Related Articles

Related image1
KC To Shilphata Bullet Train: जमीन, डोंगर आणि समुद्र चिरून धावणार 'बुलेट ट्रेन'! बीकेसी ते शिळफाटा कामाला वेग; मुंबईत दाखल होणार महाकाय मशिन्स
Related image2
Duronto Express: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दुरांतो एक्स्प्रेस आता नव्या रूपात धावणार; गर्दीचं टेन्शन मिटणार, पाहा काय बदलले?
35
समर स्पेशल ट्रेन्सचे सविस्तर वेळापत्रक
Image Credit : Social Media

समर स्पेशल ट्रेन्सचे सविस्तर वेळापत्रक

खालील तक्त्यावरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेनची निवड करू शकता.

ट्रेन नंबर,कुठून - कुठे,कालावधी

०९२०७,वांद्रे टर्मिनस - भावनगर,३ एप्रिल ते ३१ जुलै २०२६

०९४१५,वांद्रे टर्मिनस - गांधीधाम,२ एप्रिल ते ३० जुलै २०२६

०९०३७,वांद्रे टर्मिनस - भुज,३ एप्रिल ते ३१ जुलै २०२६

०९००९,वांद्रे टर्मिनस - भुज,५ एप्रिल ते २६ जुलै २०२६

०९०११,वांद्रे टर्मिनस - भुज,७ एप्रिल ते २८ जुलै २०२६

०९०१७,वांद्रे टर्मिनस - वेरावल,५ एप्रिल ते २६ जुलै २०२६

०९०५५,वांद्रे टर्मिनस - उधणा,१ एप्रिल ते २९ जुलै २०२६

०९०३५,वांद्रे टर्मिनस - उधणा,३ एप्रिल ते ३१ जुलै २०२६

०९०५६,उधणा - वांद्रे टर्मिनस,१ व ३ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ 

45
उत्तर भारतासाठीही विशेष सोय!
Image Credit : South Western Railways - SWR

उत्तर भारतासाठीही विशेष सोय!

केवळ गुजरातच नाही, तर उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. मुंबई सेंट्रल ते हरियाणातील बनमनखी स्थानकादरम्यान समर स्पेशल ट्रेन (ट्रेन नं. ०९००१/०९००२) आठवड्यातून दोन दिवस (मंगळवार आणि शुक्रवार) ३१ जुलैपर्यंत धावणार आहे. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : South Western Railways - SWR

महत्त्वाची टीप

या सर्व गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक लवकरच रेल्वेच्या पोर्टलवर उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी प्रवासी www.irctc.co.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Duronto Express: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दुरांतो एक्स्प्रेस आता नव्या रूपात धावणार; गर्दीचं टेन्शन मिटणार, पाहा काय बदलले?
Recommended image2
KC To Shilphata Bullet Train: जमीन, डोंगर आणि समुद्र चिरून धावणार 'बुलेट ट्रेन'! बीकेसी ते शिळफाटा कामाला वेग; मुंबईत दाखल होणार महाकाय मशिन्स
Recommended image3
Mumbai Metro: सावधान! मुंबई मेट्रोतून फिरताना आता फोन लागणार नाही; प्रवाशांचा संताप, पाहा नेमकं काय घडलं?
Recommended image4
Mhada Lottery 2026: मुंबई-ठाण्यात स्वतःच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची 5000 घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' प्राईम लोकेशन्सवर मिळणार संधी
Recommended image5
Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी लोकल प्रवाशांचे 'मेगा'हाल; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर १० तासांचा जम्बो ब्लॉक
Related Stories
Recommended image1
KC To Shilphata Bullet Train: जमीन, डोंगर आणि समुद्र चिरून धावणार 'बुलेट ट्रेन'! बीकेसी ते शिळफाटा कामाला वेग; मुंबईत दाखल होणार महाकाय मशिन्स
Recommended image2
Duronto Express: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दुरांतो एक्स्प्रेस आता नव्या रूपात धावणार; गर्दीचं टेन्शन मिटणार, पाहा काय बदलले?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved