MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला; खेडशिवापूर, अनेवाडीला खिसा रिकामा होणार, पण 'या' मार्गावर दिलासा!

महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला; खेडशिवापूर, अनेवाडीला खिसा रिकामा होणार, पण 'या' मार्गावर दिलासा!

Pune-Satara highway toll increase: पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर आणि अनेवाडी टोलनाक्यांवर १ एप्रिल २०२६ पासून ५% दरवाढ लागू झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सुविधांचा अभाव असताना ही वाढ झाल्याने संताप व्यक्त होत आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 04 2026, 03:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
महागाईचा 'टोल'धाड! पुणे सातारा प्रवास महागला
Image Credit : X

महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला

पुणे: आधीच इंधन दरवाढीने होरपळणाऱ्या सामान्य जनतेला आता टोलच्या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) १ एप्रिल २०२६ पासून पुणे-सातारा महामार्गावरील टोल दरात सुमारे ५ टक्क्यांची वाढ केली आहे. खेडशिवापूर आणि अनेवाडी टोलनाक्यावर आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
पुणे-सातारा प्रवास, कुठे किती वाढ?
Image Credit : Asianet News

पुणे-सातारा प्रवास, कुठे किती वाढ?

खेडशिवापूर आणि अनेवाडी टोलनाक्यांवर नव्या दरपत्रकानुसार वाहनांच्या श्रेणीनुसार बदल झाले आहेत. विशेष म्हणजे सुविधांचा अभाव असताना ही दरवाढ लादल्याने वाहनधारक नाराज आहेत.

Related Articles

Related image1
Property Rules: आई-वडिलांच्या पश्चात मालमत्तेचा हक्क मिळवायचा? 'या' ५ कायदेशीर स्टेप्स फॉलो करा आणि कौटुंबिक वाद टाळा!
Related image2
रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचंय? जाणून घ्या सोपी आणि जलद प्रक्रिया
37
१. अनेवाडी टोलनाका (नवे दर)
Image Credit : Asianet News

१. अनेवाडी टोलनाका (नवे दर)

कार/जीप/व्हॅन: ८५ रुपये (एकेरी) आणि १३० रुपये (दुहेरी) - या दरात बदल नाही.

मिनी बस/हलकी मालवाहू वाहने: १४० रुपये (एकेरी) आणि २१० रुपये (दुहेरी).

जड वाहने (मल्टि-अॅक्सल): ४६५ रुपये (एकेरी) आणि ६९५ रुपये (दुहेरी).

अतिविशाल वाहने (७+ अॅक्सल): ५६५ रुपये (एकेरी) आणि ८४५ रुपये (दुहेरी). 

47
२. खेडशिवापूर टोलनाका (नवे दर)
Image Credit : Getty

२. खेडशिवापूर टोलनाका (नवे दर)

कार: १२५ रुपये (एकेरी) आणि १९० रुपये (दुहेरी).

बस/ट्रक: ४२५ ते ६४० रुपये.

मल्टि-अॅक्सल वाहने: ६६५ ते १००० रुपये. 

57
सांगली-सोलापूरकरांना 'अच्छे दिन'; तासवडे-किणीतही दिलासा!
Image Credit : our own

सांगली-सोलापूरकरांना 'अच्छे दिन'; तासवडे-किणीतही दिलासा!

एकडे पुणे-सातारा प्रवास महागला असताना, दुसरीकडे काही मार्गांवर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

सांगली-सोलापूर: रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील नव्या दरांमध्ये कपात झाल्याने सांगली-सोलापूर प्रवास काहीसा स्वस्त झाला आहे. 

67
तासवडे आणि किणी नाका
Image Credit : our own

तासवडे आणि किणी नाका

कराडजवळील तासवडे आणि कोल्हापूरजवळील किणी टोलनाक्यावर दरवाढ करण्यात आलेली नाही. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याने जुन्या दरानेच वसुली सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

77
सुविधा शून्य, मग वसुली का?
Image Credit : stockphoto

सुविधा शून्य, मग वसुली का?

महामार्गावर पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे आणि खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक होतोय. अशा स्थितीत ५ टक्के जादा टोल कशासाठी? असा सवाल आता सामान्य वाहनचालक विचारत आहेत.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही, पत्रकार परिषदेत काय केला खुलासा?
Recommended image2
Maratha Reservation Agitation : ‘सरकारकडून वारंवार विश्वासघात’; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, नव्या आंदोलनाचे संकेत
Recommended image3
Missing Link Accident : मिसिंग लिंक पुन्हा चर्चेत; बसची तीन वाहनांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
Recommended image4
लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले पैसे, एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा
Recommended image5
तटकरे आणि पटेल यांना कार्यकारणीतून वगळले, सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाने बसला सर्वांना धक्का
Related Stories
Recommended image1
Property Rules: आई-वडिलांच्या पश्चात मालमत्तेचा हक्क मिळवायचा? 'या' ५ कायदेशीर स्टेप्स फॉलो करा आणि कौटुंबिक वाद टाळा!
Recommended image2
रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचंय? जाणून घ्या सोपी आणि जलद प्रक्रिया
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved