- Home
- Maharashtra
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिवाळ्यात धावणाऱ्या 3 विशेष गाड्यांना मुदतवाढ; 25 अतिरिक्त फेऱ्यांची भर
पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिवाळ्यात धावणाऱ्या 3 विशेष गाड्यांना मुदतवाढ; 25 अतिरिक्त फेऱ्यांची भर
Pune Railway Update: हिवाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाने 3 विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार बिकानेर-शिर्डी, अजमेर-दौंड, अजमेर-सोलापूर मार्गावरील गाड्यांच्या 25 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणारय.

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर!
Pune Railway Update: हिवाळ्याच्या सिझनमध्ये वाढत्या प्रवासी ताणामुळे पुणे रेल्वे विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विभागातून धावणाऱ्या तीन हिवाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देत एकूण 25 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या गाड्यांना मिळाली मुदतवाढ?
बिकानेर – साईनगर शिर्डी विशेष (गाडी क्रमांक 04715 आणि 04716)
04715: बिकानेर–साईनगर शिर्डी
आधीची मुदत: 29 नोव्हेंबर
नवी मुदत: 27 डिसेंबरपर्यंत धावणार
04716: साईनगर शिर्डी–बिकानेर
नवी मुदत: 28 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार
या मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दोन्ही गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
कोणत्या गाड्यांना मिळाली मुदतवाढ?
अजमेर – दौंड – अजमेर विशेष (गाडी क्रमांक 09625 आणि 09626)
09625: अजमेर–दौंड–अजमेर
चार अतिरिक्त फेऱ्यांसह 25 डिसेंबरपर्यंत धावणार
09626: दौंड–अजमेर
26 डिसेंबरपर्यंत सुरू राहील
या सेवेमुळे पुणे परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कोणत्या गाड्यांना मिळाली मुदतवाढ?
अजमेर – सोलापूर – अजमेर विशेष (गाडी क्रमांक 09627 आणि 09628)
09627: अजमेर–सोलापूर–अजमेर
कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढवला
09628: सोलापूर–अजमेर
पूर्वनियोजनानुसार 4 फेऱ्यांऐवजी आता 1 जानेवारी 2026 रोजी धावणार
हिवाळ्यात या मार्गावर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हे बदलाव करण्यात आले आहेत.
प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी
पुण्यातून धावणाऱ्या या तीन विशेष गाड्यांची मुदतवाढ आणि अतिरिक्त फेऱ्यांची घोषणा ही प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. हिवाळी प्रवास सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे.

