- Home
- Maharashtra
- मोठा निर्णय! पुण्याच्या ST स्थानकांवर सुरक्षा वाढवली; महिलांनी रात्री बिनधास्त प्रवास करा!
मोठा निर्णय! पुण्याच्या ST स्थानकांवर सुरक्षा वाढवली; महिलांनी रात्री बिनधास्त प्रवास करा!
Pune Bus Stand Security Updates : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) पुणे शहरातील स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

रात्रीही निर्धास्त प्रवासाची हमी
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) पुणेकरांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वारगेट आणि शिवाजीनगर या शहरातील दोन अत्यंत वर्दळीच्या बसस्थानकांवर आता वाढीव सुरक्षा व्यवस्थेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यांदाच स्वतंत्र आणि प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सुरक्षाव्यवस्था का वाढवली?
दररोज हजारो प्रवासी या दोन्ही स्थानकांतून विविध दिशांना प्रवास करतात. सकाळ-संध्याकाळी होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे शिस्त राखणे, अनधिकृत व्यक्तींची ये-जा थांबवणे आणि चोरीसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे हे एक आव्हान निर्माण झाले होते.
एसटी प्रशासनाने या ठिकाणी वाढवली सुरक्षाव्यवस्था
ये-जा मार्गांच्या दोन्ही बाजूंवर
तिकीट खिडकी परिसरात
तसेच स्थानकाच्या मुख्य विभागात
विशेष सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.
प्रवाशांना काय लाभ होणार?
या नव्या व्यवस्थेमुळे
संशयास्पद हालचालींवर काटेकोर लक्ष
आकस्मिक प्रसंगात तातडीने प्रतिसाद
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची अधिक खात्रीशीर सुरक्षा
यामुळे रात्रीचा प्रवासही आता अधिक निश्चिंत व सुरक्षित होणार आहे.
आधुनिकीकरणाची पुढील पावले
विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी माहिती दिली की, पुणे, स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या तिन्ही केंद्रांवर सुरक्षारक्षकांची स्वतंत्र टीम २४x७ काम करत आहे. पुढील टप्प्यात नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करणे.
महिला सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणे
ही पावले राबवून सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळकटी दिली जाणार आहे. यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अडथळे कमी होतील आणि त्यांची सुरक्षितता अधिक सुनिश्चित होईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

