- Home
- Maharashtra
- Police Bharati 2025 : पोलीस भरतीसाठी अजून अर्ज केला नाही? शेवटची तारीख आता जवळ!, राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर
Police Bharati 2025 : पोलीस भरतीसाठी अजून अर्ज केला नाही? शेवटची तारीख आता जवळ!, राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर
Police Bharati 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ७ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. राज्य पोलीस दल आणि कारागृह विभागातील एकूण १५,६३१ जागांसाठी ही भरती होत असून, अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना ही संधी मिळाली आहे.

पोलीस भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठी खुशखबर!
Maharashtra Police Recruitment 2025: पोलीस भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठी खुशखबर! राज्य सरकारने भरतीची अंतिम तारीख वाढवली असून अजूनही अर्ज न केलेल्या उमेदवारांना अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर झालेल्या या मेगाभरतीची शेवटची तारीख मूळतः नोव्हेंबर 2025 होती. परंतु अर्ज करताना अनेकांना आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवून आता 7 डिसेंबर 2025 केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी नक्की वापरावी.
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती सन २०२४-२५ साठी अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ०७ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.#पोलीस_भरतीpic.twitter.com/aBujZLHt6H
— महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@DGPMaharashtra) December 1, 2025
एकूण 15,631 जागांवर मेगाभरती, दोन विभागात नोकरीची संधी
राज्य पोलीस दल आणि कारागृह विभागातील विविध पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे. खालीलप्रमाणे जागांची संख्या जाहीर करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई – 12,399 जागा
पोलीस शिपाई चालक – 234 जागा
बॅण्डस्मन – 25 जागा
सशस्त्र पोलीस – 2,393 जागा
कारागृह शिपाई – 580 जागा
एकूण जागा : 15,631
ही भरती खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे.
अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख, लक्षात ठेवा!
अर्ज भरण्याची अखेरची तारीख : 7 डिसेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 10 डिसेंबर 2025 (रात्री 11:50 पर्यंत)
29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आल्याने उमेदवारांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
एकाच दिवशी लेखी परीक्षा, अर्ज करताना घ्यावी खबरदारी
संपूर्ण राज्यभर एकाच पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
म्हणूनच
एका पदासाठी उमेदवार फक्त एका विभागातच अर्ज करू शकणार
एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सर्व अर्ज बाद होतील
ऑनलाईन भरताना ही बाब विशेष लक्षात ठेवावी.
अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात वाचणे अनिवार्य
भरतीची सविस्तर माहिती, पात्रता, अटी, शारीरिक चाचण्या आणि दस्तऐवजांची यादी जाणून घेण्यासाठी policerecruitment2025 pdf ही लिंक वापरून जाहिरात पाहावी. अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुमच्यासाठी अजूनही संधी आहे
पोलीस दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मुदतवाढ मोठा दिलासा ठरली आहे. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल, तर संधी गमावू नका. 7 डिसेंबरपूर्वी नक्की अर्ज करा.

