- Home
- Maharashtra
- Pune Metro Diwali Schedule: दिवाळीमध्ये पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वेळापत्रकात विशेष बदल
Pune Metro Diwali Schedule: दिवाळीमध्ये पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वेळापत्रकात विशेष बदल
Pune Metro Diwali Schedule: दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, 21 ऑक्टोबर 2025 रोजी, पुणे मेट्रोच्या सेवेत बदल करण्यात आला आहे. या दिवशी मेट्रो फक्त सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत धावेल आणि त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत बंद राहील.

दिवाळीमध्ये पुणे मेट्रोचा मोठा निर्णय!
पुणे: दिवाळीचा सण म्हटला की घराघरात उत्साहाचं वातावरण असतं. अशा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी मेट्रो सेवा मर्यादित वेळेसाठीच उपलब्ध असणार आहे. या दिवशी मेट्रो सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर, सायंकाळी 6 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सेवा पूर्णतः बंद राहणार आहे.
प्रवाशांसाठी सूचना
लक्ष्मीपूजन हा सण खास असतो आणि त्या दिवशी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिल्या जातात. त्यामुळे मेट्रोचा वापर करणाऱ्या नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवावे, ही विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
"मेट्रोने प्रवास करायचा असल्यास, मंगळवारी सकाळी किंवा दुपारीच प्रवास पूर्ण करावा, संध्याकाळी मेट्रो सेवा उपलब्ध नसेल," असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केलं आहे.
मेट्रो सेवा नियमित कधी सुरू होणार?
बुधवार, 22 ऑक्टोबर 2025 पासून मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे पुन्हा सुरू होणार आहे. या दिवशी मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावेल.
प्रशासनाची विनंती आणि दिलगिरी
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही सूचना वेळेत देत, दिलगिरीही व्यक्त केली आहे. सणाच्या दिवशी मेट्रो बंद राहणार असल्याने, प्रवाशांनी आधीच तिकीट आणि वेळापत्रकाची माहिती तपासून योग्य निर्णय घ्यावा.
महत्वाच्या टिप्स
प्रवासाच्या आधी mAhaMetro अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक तपासा.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गर्दीचा अंदाज घेऊन प्रवासाचे नियोजन ठरवा.
अत्यावश्यक प्रवास असल्यास पर्यायी वाहतूक साधनांची व्यवस्था करून ठेवा.

